शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना तातडीने अटक करावी – एकनाथ शिंदे

Homeताज्या बातम्या

शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना तातडीने अटक करावी – एकनाथ शिंदे

मुंबई : कर्नाटकमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या

एसटीच्या कर्मचार्‍यांच्या संपाला गालबोट; सुर्ली घाटात आटपाडी-कराड बसवर दगडफेक
माणुसकी मेली की काय? सोनभद्रमध्ये ट्रकच्या भीषण अपघातात चालक जळत असताना लोक व्हिडिओ काढण्यात मग्न!
यंदा रायगडी घुमणार राजधानीचा आवाज; राज्यभिषेक कलशाचे विधीवत पूजनास शिवभक्तांची उपस्थिती

मुंबई : कर्नाटकमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे. कर्नाटक सरकारने बेळगाववर हक्क सांगण्यासाठी तिथे अधिवेशनाचा घाट घातला आहे. बंगळुरूमधील गुन्हेगाराला तातडीने अटक व्हावी आणि अनधिकृत लाल-पिवळ्या ध्वजाचे स्तोम थांबवावे, अशी प्रतिक्रिया मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. बेळगावमधील मराठी भाषिकांवर कर्नाटकमध्ये अत्याचार होत असल्याचा आरोप शिवसेनेकडून वारंवार केला जातो. यावर शिंदे म्हणाले की, मराठी जनतेवरील अन्यायामुळे आपण यशस्वी होऊ असा कर्नाटकचा समज असेल, तर त्यांनी तो मनातून काढून टाकावा. रस्त्यावरच्या आणि न्यायालयातील दोन्ही लढ्यांत विजय मिळेपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही.

COMMENTS