Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोणीतील गौरी सजावट बक्षीण वितरण उत्साहात

राहुरी ः एक हात मदतीचा या सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या ग्रुपच्या वतीने लोणी येथे गौरी सजावट बक्षीस वितरण सोहळा जल्लोषमय वातावरणात संपन्न झाला

पिण्याच्या पाण्याच्या टाकीत चक्क ढीगभर घाण | पहा ‘माझं गाव, माझी बातमी’ | LokNews24
पाण्याच्या वादातून कोयत्याने वार
तब्बल 110 वर्षांनी झाली संस्थेची घटना अंतिम

राहुरी ः एक हात मदतीचा या सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या ग्रुपच्या वतीने लोणी येथे गौरी सजावट बक्षीस वितरण सोहळा जल्लोषमय वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणेमाजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील होत्या. तसेच लोणी ग्रामपंचायत च्या सरपंचश्रीमती कल्पनाताई विठ्ठल मैड उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दिपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी रविंद्र माळवे यांनी प्रास्ताविक करताना एक हात मदतीचा ग्रुपद्वारे केलेल्या कार्याचा आढावा सादर केला. यानंतर गौरी सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा पैठणी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.यामध्ये माजी अध्यक्षा जिल्हा परिषद अहमदनगर सौ शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रथम बक्षिस ज्योतीताई योगेश लोळगे यांना दिले. तसेच द्वितीय बक्षीस शकुंतलाताई गोकुळशेठ चिंतामणी यांना लोणी ग्रामपंचायत सरपंच कल्पनाताई मैड याच्या हस्ते पैठणी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तृतीय बक्षीस कविताताई नित्यानंद मैड, व उत्तेजनार्थ बक्षीस अनिताताई सोमनाथ डहाळे यांना हरिषशेठ दत्तात्रय मैड, उदयशेठ त्र्यंबक महाले, आदित्यशेठ दहिवाळ यांच्या हस्ते पैठणी व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी शालिनीताई विखे पाटील यांनी एक हात मदतीचा या ग्रुपचा कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मेजर शेवंते, रविशेठ माळवे, श्रीपाद बोकंद, अशोककाका मैड, नवनाथ विखे पाटिल, उदयशेठ महाले, ज्ञानेश्‍वर साबळे अनेकानी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच रंगनाथशेठ पितळे, कोंडीराम चव्हाण, योगेश शेठ लोळगे, संतोष शेवंते, अशोकसर लोळगे, राजेंद्र लोळगे, मदनशेठ उदावंत, श्रीपादशेठ चिंतामणी, रविशेठ मैड दीपक दीवेकर, सोमनाथ आहेर, पत्रकार कैलास विखे, गजानन बोकंद तसेच एक हात मदतीचा ग्रुप सर्व संचालक मंडळ व सर्व महिला सदस्य उपस्थित होते.

COMMENTS