Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा शारदा ज्ञानोत्सव आहे-रणवीर पंडित

भेंडटाकळीत गाजल् या संस्थेअंतर्गत वादविवाद स्पर्धा

गेवराई - विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे या भावनेतून संस्थाअंतर्गत शारदा ज्ञानोत्सवात विविध स्पर्धा होत आहेत. वक्तृत्व आणि वादविवाद स

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
भाऊबीजेच्या ओवाळणीसाठी गेलेल्या बहीण-भावाचा अपघाती मृत्यू (Video)
अकोल्यात बळीराजाची मिरवणूक उत्साहात

गेवराई – विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे या भावनेतून संस्थाअंतर्गत शारदा ज्ञानोत्सवात विविध स्पर्धा होत आहेत. वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेच्या माध्यमातून गेवराई तालुक्याला भविष्यात उत्कृष्ट वक्ते मिळतील आणि ते विविध क्षेत्रात नावलौकिक करतील असा विश्वास शारदा कडमीचे संचालक रणवीर पंडित यांनी केले. माध्यमिक विद्यालय भेंडटाकळी येथे आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
युवानेते रणवीर पंडित यांच्या संकल्पनेतून जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्था अंतर्गत वादविवाद स्पर्धेचे आयोजन गुरुवार दि. 31 ऑगस्ट 2023 रोजी भेंडटाकळी येथील माध्यमिक विद्यालयात करण्यात आले होते. यावेळी जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जयसिंग पंडित, शारदा स्पोर्टस कडमीचे संचालक रणवीर पंडित, माजी सभापती वसंतराव उबाळे, सरपंच रविंद्र गाडे, शरदराव कबले, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सौ. मुक्ताताई आर्दड, मुख्याध्यापक राजेंद्र राऊत, वराट सर, युवा कार्यकर्ते आकाश जाधव, राहुल गायके, अमोल कदम, प्रकाश रडे, माजी सरपंच मोहनराव लोंडे, सोसायटीचे सचिव दत्ता उबाळे, राजीव चव्हाण, आदिनाथ शिंदे, योगगुरु लहु महाराज लोंडे, मुख्याध्यापीका श्रीमती माळी, यमुनाताई भंडारी, मुख्याध्यापक राऊत सर यांच्यासह स्पर्धेचे परिक्षक प्रा. डॉ. बापु घोक्षे, प्रा.डॉ. मनोहर सिरसट, प्रा. संतोष नागरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गंगाधर बोर्डे यांनी केले. यावेळी बोलताना सरपंच रविंद्र गाडे म्हणाले शिक्षण हे आजच्या काळातही महत्वाचे आहे. राजकारणात देखील शिक्षण महत्त्वाचे आहे, वादविवाद स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाची जडणघडण होत आसते असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना वसंतराव उबाळे म्हणाले की, आदरणीय शिवाजीराव दादा पंडित यांच्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झाली, जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्था विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशिल आहे असेही ते म्हणाले. पुढे बोलताना रणवीर पंडित म्हणाले की, संस्थेच्या विविध मुख्याध्यापक आणि शिक्षकांची आपल्या शाळेच्या प्रती तळमळ आहे, त्यांच्या योगदानातूनच संस्थेची वाटचाल चालू आहे आहे. आज पाहुण्यांच्या स्वागतासाठी झाडाचे रोप दिले आहे ते आपल्या भागात जाऊन निसर्गाचे संवर्धन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी झालेल्या स्पर्धेत संस्थेच्या आठरा शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी माध्यमिक गटात राजकारणामध्ये येण्यासाठी शैक्षणिक पात्रता असावी/नसावी. महिलांना आरक्षण देणे योग्य/ अयोग्य. खाजगी शिकवणी वर्ग योग्य/अयोग्य या विषयावर विद्यार्थ्यांनी आपली बाजू मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव चाटे यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद गोरकर, सहप्रशासनाधिकारी प्रा. काशिनाथ गोगुले, मुख्याध्यापक राजेंद्र जगदाळे, वसंतराव राठोड, राजेंद्र घुंबार्डे, अशोक तौर, प्रा. सतिश चव्हाण, किशोर पंडित, बाळासाहेब पंडित, सय्यद युनुस, भक्तराज पौळ, बाबुराव टकले, भाऊसाहेब आडाळे, भागुजी ठोंबरे, दत्तात्रय देशपांडे, यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थीनी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS