वंदे भारत एक्सप्रेसला तिसर्‍यांदा अपघात

Homeताज्या बातम्यादेश

वंदे भारत एक्सप्रेसला तिसर्‍यांदा अपघात

नवी दिल्ली/प्रतिनिधी : देशातील सर्वात वेगवान ट्रेन वंदे भारत एक्सप्रेसचागुजरातमध्ये पुन्हा अपघात झाला आहे. वलसाडमधील अतुल रेल्वे स्थानकावर हा अपघात

मुंबई-गोवा मार्गावर धावणार वंदे भारत एक्स्प्रेस
मुंबई-गोवा मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस
सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार

नवी दिल्ली/प्रतिनिधी : देशातील सर्वात वेगवान ट्रेन वंदे भारत एक्सप्रेसचागुजरातमध्ये पुन्हा अपघात झाला आहे. वलसाडमधील अतुल रेल्वे स्थानकावर हा अपघात झाला. गायच्या धडकेमुळे वंदे भारत एक्स्प्रेसच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारत एक्सप्रेस वलसाडमधील अतुल रेल्वे स्थानकावरून जात असताना अचानक एक गाय हायस्पीड ट्रेनसमोर आली.
गायीला ट्रेनची धडक बसली. गायीच्या धडकेने गाडीच्या पुढील भागाचे नुकसान झाले. ही घटना सकाळी 8.17 च्या सुमारास घडली. या घटनेनंतर अतुल रेल्वे स्टेशनवर सुमारे 26 मिनिटे ट्रेन उभी होती. अतुल रेल्वे स्थानकावरून 8.43 वाजता गाडी रवाना झाली. याअगोदरही या ट्रेनचा दोनवेळा अपघात झाला होता. पहिला अपघात मुंबईजवळ झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच 30 सप्टेंबर रोजी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. तेव्हा ही गाडी अहमदाबाद येथून दुपारी 2 वाजता निघाली होती. ही ट्रेन संध्याकाळी साडेसात वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचली होती. नव्या वंदे भारत एक्स्प्रेसने अहमदाबाद ते मुंबई हे 492 किमी अंतर साडे पाच तासांत पूर्ण केले होते. रेल्वे पटरी शेजारी असणार्‍या गावातील लोकांना जनावरांना पटरीवर सोडू न देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पश्‍चिम रेल्वे गांधीनगर-अहमदाबाद सेक्शनवर ट्रेनचा वेग ताशी 160 किमीपर्यंत वाढवण्याचे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कुंपण घालण्याचे काम करणार असल्याची माहिती, ठाकूर यांनी दिली होती.

COMMENTS