’मातृपितृ देवोभव ’आदर्श शिकवण देणारे पुस्तक : डॉ.अलकाताई रायभोगे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’मातृपितृ देवोभव ’आदर्श शिकवण देणारे पुस्तक : डॉ.अलकाताई रायभोगे

श्रीरामपूर/प्रतिनिधी : मानवी जीवन अमूल्य आहे, आईवडील हे जीवनाचे शिल्पकार आहेत. माझे वडील प्राचार्य तुळशीराम शेळके आणि आई स्व. सौ. वत्सलाताई शेळके यां

Ahmednagar : अरणगाव येथे विवाहित महिलेची आत्महत्या… पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा
कोपरगाव पोलिसांचा गोळीबार.. एक जखमी
राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे

श्रीरामपूर/प्रतिनिधी : मानवी जीवन अमूल्य आहे, आईवडील हे जीवनाचे शिल्पकार आहेत. माझे वडील प्राचार्य तुळशीराम शेळके आणि आई स्व. सौ. वत्सलाताई शेळके यांनी केलेले संस्कार लाखमोलाचे आहेत. आई, वडिलांची शिस्त आणि संस्कृती ही जीवनात मौलिक स्वरूपाची असून या मूल्यांचे आजच्या पिढीने जतन करावे अशी शिकवण डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी संपादित केलेले ’मातृपितृ देवोभव ’हे पुस्तक देते असे विचार लातूर येथील डॉ. अलकाताई रायभोगे यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील शिवाजीनगर भागातील शेळके हॉलमध्ये इंदिरानगर येथील डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी संपादित केलेल्या ’मातृपितृ देवोभव’या पुस्तकावर दिवाळी पाडवानिमित्त परिसंवाद आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी डॉ अलकाताई रायभोगे बोलत होत्या. प्रारंभी संपादक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी पुस्तकाची माहिती देताना सांगितले की, या पुस्तकातील 20 लेख हे आई, वडिलांच्या प्रेम आणि संस्कार यावर आधारित आहेत, यातील बहुसंख्य लेखक, लेखिका ह्या सर्वसामान्य गृहिणी, विद्यार्थी, विद्यार्थी, आहेत.त्यांना लेखन हा भाग परिचयाचा नाही पण आई, वडिलांच्या ऋणानुबंध, भक्तीतून हे लेख साकारले आहेत, काही मान्यवर लेखक आहेत, त्यामुळे ह्या लेखांतील आत्मप्रेरणा अधोरेखित करण्यासारखी आहे. प्राचार्य डॉ.शन्करराव गागरे यांनी सांगितले की, मोहिनी शिवाजी काळे यांच्या आसरा प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेले हे पुस्तक कुटुंबनीती सांगणारे पुस्तक असल्याचे सांगून आई, वडील हेच दैवत आहे, त्यांची भक्ती केली तर जीवनशक्ती मिळते, असे प्रसंग सांगितले. प्राचार्य टी.ई.शेळके यांनी आई कोंडाई आणि वडील इराप्पा शेळके यांचे अनुभव सांगितले. किशोर गाढेगुरुजी आणि वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रिया फारच महत्वाच्या असल्याचे प्राचार्य शेळके यांनी सांगितले. लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा.डॉ.चंद्रकात रायभोगे यांनी आपल्या आई, वडिलांचे सेवाभावी कार्य आणि त्यांचे झालेले सन्मान हे अनुभव सांगत कुटुंब हेच जीवनाचे तीर्थस्थळ असल्याचे मनोगत व्यक्त केले.डॉ.अर्चना शेळके यांनी नियोजन केले. डॉ.अलकाताई रायभोगे यांनी आपल्या कुटुंबातील अनुभव सांगत आज आई, वडील हे दुर्लक्षित होत आहेत,अशा परिस्थितीत श्रावणबाळ मुखपृष्ठ असलेले हे पुस्तक प्रबोधक ठरणारे आहे, असे उदगार काढले. डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

COMMENTS