Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई-गोवा मार्गावर धावणार वंदे भारत एक्स्प्रेस

मुृंबई : मुंबई-गोवा या मार्गावर धावण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस सज्ज झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 03 जून रोजी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. काही

सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार
मुंबई-गोवा मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस
वंदे भारत एक्सप्रेसला तिसर्‍यांदा अपघात

मुृंबई : मुंबई-गोवा या मार्गावर धावण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस सज्ज झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 03 जून रोजी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. काही दिवसांपूर्वी वंदे भारत हायस्पीड ट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली. यशस्वी चाचणीनंतर आता वंदे भारत हायस्पीड ट्रेन मुंबई ते गोवा मार्गावर धावण्यास सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार असून, त्यापार्श्‍वभूमीवर गोव्यात मडगाव रेल्वे स्थानक ट्रेनच्या उद्घाटनासाठी सज्ज करण्यात आले आहे.
वंदे भारत हायस्पीड ट्रेनला 03 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यावेळी मडगाव स्थानकावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर, 5 जूनपासून वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या नियमित सेवेत दाखल होणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून ही गाडी पहाटे 5 वाजून 35 मिनिटांनी सुटेल पुढे ठाणे, पनवेल, खेड असा प्रवास करत रत्नागिरीला सकाळी दहा वाजता ट्रेन येईल. दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी ट्रेन गोव्यात मडगावला दाखल होईल. मडगाव येथून ट्रेन दुपारी 2 वा. 35 मिनिटांनी मुंबईसाठी सुटेल. त्यानंतर रत्नागिरी, खेड इथून सहा वाजून 48 मिनिटांनी मुंबईच्या दिशेने रवाना होईल. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही गाडी रात्री दहा वाजून 35 मिनिटांनी पोहोचेल. वंदे भारत हायस्पीड ट्रेनला सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे थांबा देण्यात आला आहे. मुंबईकडून मडगावला जाताना कणकवली येथे 11.20 वा ट्रेन पोहोचेल. तर, मडगाववरून मुंबइकडे जाताना 4.10 वाजता ट्रेन कणकवलीत थांबेल.

COMMENTS