म्हणे, वेश्यानां आधार…

Homeताज्या बातम्यासंपादकीय

म्हणे, वेश्यानां आधार…

भारत देश हा सुजलाम सुफलाम देश आहे, असे बाल वयात सर्वांनीच ऐकलेले. याच देशात सोन्याचा धूर निघत होता, असे बोलले जाते. असल्या आभासी पुळचट ऐकनावळी आपण ऐक

दंगलीमागचे राजकारण
कोरोनाच्या नव्या विषाणूचा धोका
न भयं न लज्जा !

भारत देश हा सुजलाम सुफलाम देश आहे, असे बाल वयात सर्वांनीच ऐकलेले. याच देशात सोन्याचा धूर निघत होता, असे बोलले जाते. असल्या आभासी पुळचट ऐकनावळी आपण ऐकत असतो. तसे ते अनेक ठिकाणी लिहिले देखील आहे. आपण हे थोड्या वेळासाठी खरे देखील म्हणू. मग सोन्याचा धूर निघत होता, तर आपल्या देशातील कोणत्या ठिकाणांवरु तो धूर निघत होता? बरं, त्याला काडी (आग) कोण लावत होत. दुसरे असे की, सोने कधी जळते का? ब्रिटिशांनी ते आपल्या देशातून नेले हे सत्यच. पण, धुराचे काय? आता सुजलाम सुफलाम आपला देश आहे, असे धड-धड म्हटले जाते. मग आपल्या देशात शेतकरी आत्महत्या का करतात? उगीच आपलीच टिर आपणच बडवून घेण्याचा हा प्रकार. आपल्या देशातील वास्तवात आपण डोकावून बघितले तर सर्वत्र विषमतावादाची गटारगंगा आपल्याला दिसते. या देशात जातिव्यवस्थेमुळे विषमतावादाचा उन्माद माजला आहे. प्रत्येकजण आपल्या नेणिवेतील जातीचे समर्थन करत असतो. जातीने माणसांचा जगन्यायला आणि मारण्यातला व्यवहार निश्चित केलेला असतो. जात हि काहींना ष्रेष्ठत्व तर काहींना कनिष्ठत्व बहाल करते. जे कनिष्ठ जातीतील लोक आहेत त्यांच्यावर जात आधारित कनिष्ठतेचे कामे नेमून दिलेले असतात. आणि आजही ते सुरु आहे. जो कोणी म्हणतो ना, कि आता जात कुठे राहिली, कुणीही कुणाचाही व्यवसाय करतो. आता बाटा चर्मकारांचा चपलांचा व्यवसाय करतो.  असे म्हणणाऱ्याच्या कानशिलात लगावली पाहिजे. आणि त्याला सांगितले पाहिजे की, बाटा चपलेला पॉलिश किंवा खिळे मारत नाही. ते काम आजही चर्मकारचं करतात.
जाती आणि माती ( जमीन ) हे विषमतावादाचे पुरस्कर्ते. आता सर्वाना वाटेल की, मातीचा काय संबंध? इथेच तर खरी मेख आहे. आपल्याकडे जमिनी कोणत्या जातीच्या लोकांकडे आहेत? किंबहुना: आपल्याकडील जमीनदार हे कोणत्या जातीचे आहेत? हे तपासले तर ते लक्षात येते. आता हे जमीनदार किती जातीचे कट्टर असतात हे लक्षात आल्याशिवाय रहात नाही. जे जातीचे गेंडे गरीब, कष्टकरी, खालच्या जातीच्या लोकांचे हर तऱ्हेचे शोषण करतात. मग ते शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि लैंगिक देखील. आपण अशा अनेक घटना माध्यमांमधून बघत असतो, ऐकत असतो की, शेतात शेत मालकाने किंवा त्याच्या मुलाने शेतकामगाराच्या मुलीवर बलात्कार केला. पण अशी बातमी कुणी ऐकली का की, शेतमालकांच्या मुलीवर कामगारांच्या मुलांनी बलात्कार केला? समजा जर एखाद्या हलक्या समजल्या जाणाऱ्या जातीतील कामगारांच्या मुलांसोबत श्रीमंत जमीनदारांच्या मुलींनी प्रेम केले तर त्याचा सैराट होतो हे कुणालाही नाकारता येणारे नाही.
या जातिव्यवस्थेमध्ये खालचा वर्ग आजही गुलामीत जगत आहे. त्या वर्गाचं जगणंच मुळात या ष्रेष्ठ गणल्या गेलेल्याना मान्य नाही. जर त्यांना जगायचे असेल तर त्यांना स्वामीमूल्याप्रमाणे खालच्या स्थरावरचे कामे करून जगावे लागते. यात वरच्या जातीतील लोक खालच्या स्तरातील कामे करत नाहीत. आपण एक उदाहरण घेऊ. उदा. महानगर पालिकेत रस्ते आणि गटारे साफ करण्याचे कामे हे खालच्या जातीचेच लोक करतात. त्या कामात एकही वरच्या जातीची व्यक्ती नसते. हे सगळं जे जाळं आहे ते या जातींच्या धाग्यांनी विणले गेले आहे. या जातिव्यवस्थेने काही जातीतील महिला उपभोगण्याचा धर्मदत्त नियम केलेला आहे आणि तो आजही पाळला जात आहे. आता मागे आपल्या देशात लता मंगेशकर यांचं निधन झालं त्या मंगेशकर ज्या जातीच्या होत्या त्याचा इतिहास कुणाला माहित नाही. मंगेशकर या  ‘गोमांतकीय मराठा जातीतील’तील होत्या.  गोवा / गोमंतक, कारवार, तळकोकण / सिंधुदुर्ग, बेळगाव आदी भागात  देवदासी किंवा भाविणी आहेत. या भाविणी म्हणजे, देवाला वाहिलेल्या स्त्रिया असतात. यांचे लग्न ग्रामदेवळातील देव शंकराशी म्हणजे मंगेशाशी होते. आणि मग त्या गावातील कोणत्याही प्रतिष्ठित, सधन संपत्ती असलेल्या पुरुषाचे अंगवस्त्र म्हणून राहतात. हे वास्तव कोणाला नाकारून जमेल. आता अशा जातीच्या स्रियांना पोटासाठी वेश्या व्यवसाय करावा लागतो. त्याला धर्माचे संदर्भ आहेत.  
नुकतीच नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन या संस्थेने काल जारी केलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना आधारकार्ड जारी करणार असल्याची माहिती, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. तसेच आधारकार्ड जारी करण्यासाठी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र मागितले जाणार नाही. असे देखील UIDAI ने न्यायालयाला म्हटले. त्यामुळे आता वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना देखील राहण्याचा पुरावा न देता आधारकार्ड मिळणार आहे. म्हणजे, वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्रियांना आत्तापर्यंत आधार कार्ड नव्हते हे सिद्ध होते. त्यांना व्यवस्थेकडून किती बेदखल केलेले असते हा त्याचा उत्तम नमुना. या स्रियांना सन्मानाने जगण्याचा आधारच जात- धर्मव्यवस्थेने दिलेला नाही. त्यांना आधार कार्ड दिले तरी त्यांच्या जगण्यालाच आधार नाही त्याचे काय? म्हणे, आधार वेश्यानां देणार… ते आधार कार्ड धर्माच्या एटीएम मध्ये चालत नाही. या स्रियांच्या जगण्याला आधार मिळण्यासाठी इथली जातव्यवस्था संपवणे गरजेचे. त्यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत हि आशा.
.

COMMENTS