Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात यंदा रेडीरेकनर दरात वाढ नाही

मुंबई/प्रतिनिधी ः राज्य सरकारने घर खरेदी करणार्‍यांना दिलासा देत, यंदा रेडीरेकनर दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे जुन्या

मुंबईत मराठा समाजाने आरक्षणासाठी काढला मोर्चा
शाही स्नानाला साधूंची गर्दी ; नियमांची पायमल्ली झाल्याने कोरोना संसर्गाची भीती
निवडणूक कर्तव्यावर असलेल्या मतदारांसाठी मतदार सुलभता केंद्रांची स्थापना

मुंबई/प्रतिनिधी ः राज्य सरकारने घर खरेदी करणार्‍यांना दिलासा देत, यंदा रेडीरेकनर दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे जुन्या 2022-23 रेडीरेकनर दरानेच घर खरेदी करता येणार आहे. यात सरकारने मागील आर्थिक वर्षातील दरात बदल न करता 2023-2024 साठी लागू करण्यात यावा असा आदेश राज्य सरकारने काढलेल्या आदेशात दिसून येत आहे.
मुंबईमध्ये मार्च 2023 मध्ये 12421 मालमत्ता विक्री करण्यात आल्या. त्यातून राज्य सरकारला 1143 कोटींचा निधी मिळाला आहे. यापैकी 84 टक्के निवासी तर 16 टक्के अनिवासी मालमत्ता आहेत. मार्च 2023 मध्ये 1,143 कोटी महसूल संकलनासह, मुंबईने एप्रिल 2022 पासून सर्वाधिक महसूल संकलन नोंद केल्याचे नाईट फ्रँक या अहवालात म्हटले आहे. रेडीरेकनर ही स्थावर मालमत्तांची राज्य प्रशासनाने निश्‍चित केलेली किंमत असते. याच किंमतीवर आधारित नोंदणी आणि मुद्रांक शुल्क राज्य सरकार घेत असते. म्हणजेच, रेडीरेकनरनुसार, एखादी जमीन 1 लाख रुपये किंमतीची असेल, तर ती विकत घेण्यासाठी कमीतकमी 1 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क सरकारकडे जमा करावे लागते. रेडीरेकनर स्थावर किंवा जंगम मालमत्ता खरेदी करणार्‍यांसाठी उपयुक्त ठरते. रेडीरेकनरमध्ये जिल्हा, तालुका आणि गाव यांनुसार स्वतंत्र दर निश्‍चित करण्यात येतात. रेडीरेकनरनुसार मालमत्तेचा बाजारभाव निश्‍चित होतो. रेडी रेकनरचा उपयोग सर्वसामान्य माणसांपासून बांधकाम व्यावसायिक, कर्ज देणार्‍या बँका, वकील, एजंट इत्यादींना होतो.

COMMENTS