Homeताज्या बातम्यादेश

दहशतवादावरील दुटप्पी भूमिकेला थारा नाही : पंतप्रधान मोदी

कझान : रशियातील कझान येथे ब्रिक्स देशांची सुरू असलेल्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दहशतवादावरून चांगलेच सुनावले. या परिषदे

कान्होळा नदी परिसरातील जलपर्णी हटवली
कारागृहातील बंदीवानांच्या सृजनशीलतेला मिळाले व्यासपीठ : पालकमंत्री छगन भुजबळ
हिंजवडी मध्ये आढळला बेवारस मृतदेह.

कझान : रशियातील कझान येथे ब्रिक्स देशांची सुरू असलेल्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दहशतवादावरून चांगलेच सुनावले. या परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी रशिया-युक्रेन संघर्षाचे शांततापूर्ण भूमिकेचा पुनरुच्चार करत पुन्हा एकदा शांततेचे आवाहन केले. यासोबतच जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी दहशतवादाला थारा देणार्‍यांना ब्रिक्स परिषदेत जागा नसल्याचा पुनरूच्चार केला आहे.
गेल्या तीन महिन्यात पंतप्रधान मोदी दुसर्‍यांदा रशियाच्या दौर्‍यावर आहेत. त्यांच्या या दौर्‍यावेळी रशियाने केलेल्या आदरातिथ्याबाबत पंतप्रधान मोदींनी आभार व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की, नवीन स्वरूप जगातील 40 टक्के मानवतेचे आणि सुमारे 20 टक्के अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करते. गेल्या दोन दशकात संस्थेने अनेक यश संपादन केले आहे. मला आशा आहे की ब्रिक्स हे जागतिक आव्हानांसाठी अधिक प्रभावी माध्यम म्हणून उदयास येईल. नवीन स्वरूपात ब्रिक्स ही 30 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आहे. ती सर्व आव्हाने हाताळण्यास सक्षम आहे. युपीआय पेमेंट ही भारतासाठी मोठी उपलब्धी असल्याचे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले. भारत ब्रिक्स देशांसोबत युपीआय प्रणाली सामायिक करण्यास तयार आहे. इतर देशांनीही त्याचा अवलंब केला आहे. यावेळी त्यांनी ब्रिक्स देशांना मिशन लाइफ, एक पेड माँ के नाम या मोहिमेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. दरम्यान या परिषदेपूर्वी पंतप्रधान मोदींनी इराणचे अध्यक्ष मसूद पझाकियान यांची भेट घेतली. इराणचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पजाश्कियान यांची मोदींसोबतची ही पहिलीच भेट होती. दोन्ही नेत्यांमध्ये चाबहार बंदर आणि इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर संदर्भात चर्चा झाली. कनेक्टिव्हिटी आणि व्यवसायाच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे आहे. मध्यपूर्वेतील बिघडलेल्या परिस्थितीवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. तेथे होत असलेल्या संघर्षाबद्दलही मोदींनी चिंता व्यक्त केली.

COMMENTS