Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरक्षणासाठी अहिल्यादेवींच्या चरणी प्राणाहुती देण्यास तयार

उपोषणकर्त्यांचा पवित्रा ; अध्यादेश काढण्याची लेखी ग्वाही राज्य सरकारने द्यावी

जामखेड/प्रतिनिधी ः धनगर आरक्षणासाठी गेल्या 11 दिवसांपासून उपोषणकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले असून, त्यांची प्रकृती खालावत चालली आहे, मात्र जोपर

दिल्लीत 20 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार
बाजारपेठेच्या दुरवस्थेला मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी जबाबदार
अशांतता निर्माण करणारे गुन्हेगार व चिथावणीखोरांवर कडक कारवाई करा 

जामखेड/प्रतिनिधी ः धनगर आरक्षणासाठी गेल्या 11 दिवसांपासून उपोषणकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले असून, त्यांची प्रकृती खालावत चालली आहे, मात्र जोपर्यंत राज्य सरकार धनगर आरक्षणाचा अध्यादेश काढत नाही, तोपर्यंत औषध उपचारच काय पण पाणीही घेणार नाही, भलेही त्यासाठी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी प्राणाहुती द्यावी लागली तरी मागेपुढे पाहणार असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. त्यामुळे राज्य सरकारने या आरक्षणावर त्वरित तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.

धनगर आरक्षणाबाबत दोन दिवसात बैठक घेऊन मार्ग काढू असे आश्‍वासन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी चौंडी येथे उपोषणकर्त्यांना दिले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी उपोषणकर्त्यांची फोनद्वारे बोलणे केले. मात्र उपोषणकर्ते उपोषणावर ठाम राहिले. यावेळी उपोषणकर्ते माजी मंत्री, यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, सुरेश बंडगर, यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष आण्णासाहेब दांगडे देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलतांना आक्रमक पवित्रा घेत भलेही जीव गेला तरी चालेल, पण आरक्षणाचा अध्यादेश काढल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी व मध्यस्थी करण्यासाठी चौंडी येथे आले होते. अकरा दिवसांपासून चौंडी येथे आरक्षणासाठी अमरण उपोषण चालू आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दखल केले. तरीही सरकारने अकरा दिवसापर्यंत दखल घेतली नाही, एवढी मोठी धनगर समाजाची कुंचबना सरकारकडून झाल्याची खंत उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली. जोपर्यंत धनगर समाजाला तुमच्या निर्णयाबाबत विश्‍वासार्हता वाटत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार. पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी प्राण गेला तरी चालेल. असे उपोषणकर्त्यांनी ठणकावून सांगितले. बारामती येथे 2014 मध्ये 14 दिवस उपोषण केले सरकारने फक्त आश्‍वासनच दिले. आता मात्र केंद्र सरकारकडुन येत्या विशेष आधिवेशानात वटहुकुम जारी करण्याचा निर्णय घेतल्याशिवाय माघार नाही.

मंत्री गिरीश महाजनांकडून भावनिक आवाहन – अनेक वर्षांपासून चालू असलेल्या धनगर आरक्षणाच्या गंभीर विषयावर बोलतांना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर, बारामती कृषी विद्यापीठाचे नामांतर अशा भावनिक मुद्दयावर बोलून विषयांतर करण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्र्यांनी उपोषणस्थळी यायला पाहिजे होते, मात्र उशीर का झाला, याची माहिती नसल्याचे देखील महाजन यांनी यावेळी म्हटले.

राज्यव्यापी बैठक  संपन्न ; आंदोलनाची ठरवली पुढील दिशा- धनगर समाजातील सर्व आजी, माजी आमदार व सर्व संघटनांच्या पदाधिकार्‍यांची राज्यव्यापी बैठक आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी चोंडीत आयोजित केली होती. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब दोडतले, प्रदेशाध्यक्ष आण्णासाहेब दांगडे, माजी खा. विकास महात्मे आ. प्रा राम शिंदे,आ. दत्तामामा भरणे, माजी आ. रामहरी रूपनर, नीतीन धायगुडे, अक्षय शिंदे, यावेळी अनेकांनी सरकार आपली चेष्टा करत आहे. राज्य व केंद्र सरकारच्या वेळकाढू धोरणाविषयी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. आंदोलनाची तीव्रता वाढवणार असल्याचे संकेत स्पष्ट झाले. यावेळी  सोलापूर, बीडयेथून मोटारकार रँली तर पिंपरी चिंचवडहून पायी रँलीद्वारे उपोषणाला पाठींबा देण्यासाठी चोंडीला येत आहेत. राज्यातील धनगर समाज चौडीकडे रवाना होत आहे. आण्णासाहेब रूपनवर, सूरेश बंडगरची या दोन्ही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे.

मराठा आणि धनगरांना वेगळा नियम का? : बाळासाहेब दोडतले – केंद्र सरकारला खडे बोल सुनावतांना माजी मंत्री, यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले म्हणाले की, मोदी सरकार देशात जे नको ते तेही रात्रीतून लागू करतात. राममंदिर सर्वासमोर उभे करत आहात, देश संविधानावर चालवता, मग संविधानात धनगरांना आदिवासी आरखझ लागू का करत नाही ? मराठ्यांच्या आंदोलनाला वेगळा आणि धनगरांना वेगळा नियम का? बारा दिवसांपासून उपोषण उपोषण चालू आहे, दोघांची प्रकृती चिंताजनक झाली आहे, आता निर्णय होईल किंवा बाळासाहेब दोडतले मरायला तयार आहे, असा निर्वाणीचा इशाराच दोडतले यांनी दिला आहे.

COMMENTS