Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काझी गढीच्या संरक्षण भिंतीचे काम आठ दिवसात सुरु करावे अन्यथा जन आंदोलन करू

आम आदमी पार्टीचा नाशिक मनपाला ईशारा

नाशिक प्रतिनिधी - जुने नाशिक परिसरातील काझी-गढी येथील संरक्षण भिंत खचली आहे, बाकी असलेला भाग कधीही कोसळू शकतो, दरवर्षी पावसाळ्यामध्ये येथील

विजेच्या धक्क्याने 3 जणांचा मृत्यू
नवाब मलिकांना सर्वोच्च दिलासा
बेलापूरच्या उपसरपंचपदी मुश्ताक शेख

नाशिक प्रतिनिधी – जुने नाशिक परिसरातील काझी-गढी येथील संरक्षण भिंत खचली आहे, बाकी असलेला भाग कधीही कोसळू शकतो, दरवर्षी पावसाळ्यामध्ये येथील नागरिकांना घर खाली करण्याच्या सूचना नाशिक महानगरपालिकेमार्फत नागरीकांना दिल्या जातात, परंतु त्यांची पर्यायी व्यवस्था किंवा पुनर्वसनाची व्यवस्था करण्यासाठी कोणतेही ठोस कामे होत नसल्याने, तिथे राहणारे नागरिक त्याच ठिकाणी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. आम आदमीचे पदाधिकारी जितेंद्र भावे आणि योगेश कापसे यांनी सखोल माहिती घेतल्यानंतर असे समजले की पी.डब्ल्यू.डी च्या अखत्यारीत हा भाग येत असल्याने येथील कार्य पी.डब्ल्यू.डी च्या माध्यमातून होणार आहे, परंतु पीडब्ल्यूडी चा या ठिकाणी काहीही संबंध  नसताना महानगरपालिका मार्फतच या ठिकाणी आवश्यक  काम होऊ शकते.त्यामुळे तातडीने काझी-गढी या परिसरामध्ये आवश्यक संरक्षण भिंत उभारावी आणि पुढे होणारी दुर्घटना टाळावी असा ईशारा आप तर्फे देण्यात आला आहे तसेच पुढील आठ दिवसांमध्ये  या कामाला सुरुवात झाली नाही, तर आम आदमी पार्टी तर्फे काझी गढी येथील नागरिकांसह जनआंदोलन केले जाईल आणि उद्भवणाऱ्या परिस्थितीला नाशिक महानगरपालिका संपूर्णतः जबाबदार राहील.

अश्या आशयाचे निवेदन आम आदमी पार्टीच्या वतीने नाशिक महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त अशोक करंजकर यांना देण्यात आले आहे, या संदर्भात आयुक्त करंजकर हे पुढील दोन दिवसात आपल्या अधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन काम सत्कारणी लावतो असे आश्वासन आप च्या शिष्टमंडळाला दिले आहे. यावेळी आप पदाधिकारी जितेंद्र भावे, योगेश कापसे, राजेंद्र गायधनी, अमोल लांडगे, संजय कातकाडे, राजेंद्र हिंगमिरे, नितीन रेवगडे, समाधान अहिरे, प्रसाद घोटेकर, नीलम बोबडे, अनिल कौशिक, रघुनाथ चौधरी, प्रेमचंद जांगिड, अमर पवार आधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते

COMMENTS