Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कांबळे खून प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक यांना शब्बासकी पत्र !

पंकज कुमावत यांच्या कडून राजेश पाटील यांना शाबासकी!

केज प्रतिनिधी - केज येथील एका खुनाच्या तपासकामी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी आरोपी हा अज्ञात असतांनाही त्याचा शिताफीने तपास करून आरोपीला बे

दिल्ली महापालिकेवर ‘आप’चा झेंडा
सण-उत्सव पार्श्वभूमीवर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन
ज्ञानाची दारे उघडतांना…

केज प्रतिनिधी – केज येथील एका खुनाच्या तपासकामी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी आरोपी हा अज्ञात असतांनाही त्याचा शिताफीने तपास करून आरोपीला बेड्या ठोकल्या आणि सबळ पुरावा हस्तगत केल्यामुळे आणि गुंतागुंतीच्या गुन्ह्यात सतर्कता दाखवल्यामुळे केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी शाब्बासकी देऊन त्यांचे कौतुक केले आहे. या बाबतची सविस्तर माहीती अशी की, दि. 2 ऑगस्ट रोजी केज येथील कानडीमाळी रोडवर सचिन कांबळे हा व साक्षीदार मुन्ना शिंदे हे घराकडे पायी जात असताना अज्ञात आरोपीने पैसे न दिल्याचे कारणावरून सचिन कांबळे याला दगडाने ठेचून ठार मारले होते. त्या प्रकरणी मयताच्या आईच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. 466/2023 भा.दं.वि. 302 नुसार गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्याकडे देण्यात आला होता. त्या खून प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी घटनास्थळ पंचनामा करून घटनास्थळा वरील गुन्ह्यात वापरलेला दगड हस्तगत केला. तसेच गुन्हयातील आरोपीची ओळख पटवून त्याला पोलीस जमादार बाळासाहेब अहंकारे, दिलीप गित्ते आणि शमीम पाशा यांच्या मदतीने डोंगर चढून अटक केली. खुनातील आरोपी आण्णा चौरे याला अटक कर त्यास पोलीस कस्टडी मध्ये ठेवून सदर गुन्ह घटनास्थळा वटा गुन्ह्यात वापरलेला दगड हस्तगत केला. तसेच गुन्हयातील आरोपीची ओळख पटवून त्याला पोलीस जमादार बाळासाहेब अहंकारे, दिलीप गित्ते आणि शमीम पाशा यांच्या मदतीने डोंगर चढून अटक केली. खुनातील आरोपी आण्णा चौरे याला अटक करून त्यास पोलीस कस्टडी मध्ये ठेवून सदर गुन्हा उघडकीस आणला. या बद्दल पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या उत्कृष्ट तपासमुळे आरोपी अद्याप पावेतो न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांनी या खुनाच्या गुन्ह्याचा तपास 27 दिवसात पुर्ण करून दोषारोप पडताळणी कामी संचिका सहाययक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय केज येथे सादर केली आहे. त्या बद्दल सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी राजेश पाटील यांनी केलेल्या खुना सारख्या गंभीर गुन्ह्याच्या तपास कामी दाखवलेली सतर्कता हे कौतुकास्पद व उल्लेखनिय असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे राजेश पाटील यांच्यामुळे पोलीसांची प्रतिमा जनमाणसात उंचावली आहे. त्या कौतुकास्पद व प्रशंसनीय आणि उल्लेखनिय कामगिरी बद्दल पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचे कौतुक व प्रसंशा करून त्यांना प्रशस्ती पत्र दिले आहे. या बद्दल राजेश पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS