Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदिवासी महिलेवर पोलिसांनीच केला बलात्कार

जामखेड तालुक्यातील महिलेवर भूम पोलिसाकडून अत्याचार

जामखेड प्रतिनिधी ः जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आवळा या गावात रहिवासी असलेले आदिवासी समाजातील पारधी महिलेवर उस्मानाबाद जिल्हयातील कर्तव्यावर असलेल

टाकळीच्या विनोद निकोलेची महाराष्ट्र सिक्युरिटी पोलिस फोर्समध्ये निवड
पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते कृतज्ञता कोनशिलेचे अनावरण
कोपरगाव तालुक्यातील वृद्ध दाम्पत्याचा हत्या करणारे तीन आरोपी जेरबंद

जामखेड प्रतिनिधी ः जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आवळा या गावात रहिवासी असलेले आदिवासी समाजातील पारधी महिलेवर उस्मानाबाद जिल्हयातील कर्तव्यावर असलेल्या पोलिसाने 2 फेबु्रवारी रोजी अत्याचार केल्याची निंदनीय घटना घडली आहे. याप्रकरणी संताप व्यक्त करण्यात येत असून, अ‍ॅड. डॉ. अरूण जाधव यांनी केला आहे. याप्रकरणी अँड अरूण जाधव सामाजिक कार्यकर्ते विशाल पवार व त्यांच्या सहकार्‍यांनी दखल घेतल्याने पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील नायगाव येथील ऊसतोडी काम करणार्‍या कूटुंबाची मुले सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे वसतिगृहात राहून शिकत आहेत. मुलांना आई-वडिलांची आठवण आल्यामुळे तिथून गावाकडे निघाले त्यावेळी त्यांच्या आई-वडिलांना समजले की त्यांची मुले गावाकडे निघाली आहेत. त्यावेळी पीडित महिला व तिचा दीर लोकेश काळे हे दोघेजण दुपारी सुमारे 2:30 वाजता खर्डा येथून भूमकडे निघाले. त्यावेळी दुपारी 3:00च्या सुमारास भूम बस स्टॅन्ड येथे ते पोचले. बस स्टॅन्ड वरील लोकांना विचारले की बार्शी गाडी किती वाजता आहे. त्यावेळी तेथील लोकांनी सांगितले सुमारे 4:00 वाजता आहे पीडित महिला त्याच्या दिराला म्हणाली की वेळ आहे, तोपर्यंत आपण वडापावच्या गाड्यावर जाऊन वडापाव खाऊ. त्यावेळी भूम पोलीस स्टेशन येथील पोलिस दगडू भुरके व होमगार्ड सागर माने यांनी त्या पीडित महिलेला व तिच्या दिराला विचारपूस करत होते की तुम्ही कुठले आहात व तुम्ही कुठल्या जातीच्या आहात आणि कुठे निघाले आहात. त्यांनी त्यांचा परिचय दिला व त्यांनी त्यांचा परिचय देताच त्यांनी त्यांची जात सांगितली. लगेच त्यांना तातडीने ताब्यात घेतले व त्यांना पैशाची मागणी करू लागले की तू आम्हाला 50,000 हजार रुपये दे नाहीतर आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू. त्या पीडित महिलेने वारंवार विनंती करून देखील ते ऐकत नव्हते त्यावेळी त्या पिढीत महिलेने जामखेड तालुक्यातील नायगाव येथील ऊसतोड कामगारांचे मुकादम नंदू उगले यांना फोन लावून सांगितले. त्यावेळेस ते म्हणाले माझ्याकडे एवढे पैसे नाहीत मी 10,000 हजार रुपये देतो तर त्यांनी होमगार्ड सागर माने यांच्या फोन पेवर 10,000 हजार रुपये पाठवले त्यानंतर भूम पोलिस स्टेशनचे पोलिस दगडू भुरके हे म्हणाले की, मि तुम्हाला सोडून येतो. त्यावेळी त्यांना एका डोंगराकडील भागात घेऊन गेला व तिच्या दिराला म्हणाला की तु हिथेच थांब. पोलिस स्टेशनमधून मला फोन आला आहे, त्या पीडित महिलेला घेऊन तो निघाला. एक किलोमीटर अंतरावर गाडी थांबवली तू माझ्यासोबत शारीरिक संबंध कर त्यावेळी त्या पीडित महिलेने खूप विनंती केली की, मी तसे करणार नाही तरीसुद्धा पोलिसाने हाताला धरून तिला बळजबरी करून ज्वारीच्या शेतात घेऊन गेला व तिच्यावर बलात्कार केला. ही घटना आदिवासी समाजाचे नेते विशाल पवार यांना कळल्यावर त्यांनी पीडित महिलेला घरी बोलून घेतले व सविस्तर माहीती विचारपूस केली. त्यानंतर 3 फेबु्रवारी रोजी पीडित आदिवासी महिलेला घेऊन वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष भीमराव सुरवसे, आलेश शिंदे हे पीडित महिलेला घेऊन आले. भूम पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरवंसे यांना सविस्तर माहिती दिल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

रक्षकच भक्षक झाले तर न्याय कुठे मागायचा? ः अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव – पोलिस खात्याचे ब्रीदवाक्य असलेल्या सदरक्षणाय खलनिग्रणायालच पोलिसांनी काळीमा फासला आहे. आदिवासी समाजातील महिलेच्या असहासयतेचा गैरफायदा घेऊन, या महिलेवर अत्याचार केला आहे. राज्यात कायद्याचा धाक नसल्याची परिस्थिती असून, भूम जिल्हा उस्मानाबाद येथील पोलिसाने केलेल्या कृत्याचा सखोल आणि निपक्षपातीपणे चौकशी करून अत्याचारग्रस्तांना न्याय द्यावा व झालेल्या घटनेची जबाबदारी स्वीकारून या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा न दिल्यास राज्यभर आम्ही सर्व आदिवासी भटके विमुक्त रस्त्यावर उतरून व्यापक स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा भटकविमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक अँड अरूण जाधव यांनी दिला आहे.

COMMENTS