Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पवनचक्कीवर दरोडा टाकणार्‍या अट्टल टोळीला ठोकल्या बेड्या; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

पाटोदा तालुक्यातील येवलवाडी शिवारात पवनचक्कीवर काम सुरू असताना वॉचमनला मारहाण करून केबल व इतर साहित्य चोरून नेणार्‍या अट्टल चोरट्यांच्या टोळीला स

बिलोली पोलीस ठाण्यात शांतता बैठक संपन्न
महानिर्मिती-सतलज जलविद्युत निगमची संयुक्त कंपनी; राज्यात ५००० मेगावॅट क्षमतेचे ऊर्जा प्रकल्प
रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज

पाटोदा तालुक्यातील येवलवाडी शिवारात पवनचक्कीवर काम सुरू असताना वॉचमनला मारहाण करून केबल व इतर साहित्य चोरून नेणार्‍या अट्टल चोरट्यांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.
पाटोदा पोलीस ठाणे हद्दीतील येवलवाडी (ता. पाटोदा, जि. बीड) येथील शिवारात रिन्यू पॉवर कंपनीने उभारलेल्या पवनचक्कीवर सौरभ बाबुराव येवले (वय 22, रा. येवलवाडी) हे वॉचमन म्हणून काम करत होते. त्यांच्या सोबत शुभम बबन सोंडगे (रा. पारनेर, ता. पाटोदा) हा होता. दि. 25 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या दोघांना मारहाण करून पवनचक्कीतील केबल व इतर साहित्य चोरून नेले होते. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा क्रमांक 54/2026 भारतीय न्याय संहिता कलम 309(4), 127(2), 324(4) अन्वये दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, बीड व पाटोदा पोलीस ठाणे करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींबाबत माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार मधुकर आबा काळे (रा. खामकरवाडी, ता. वाशी, जि. धाराशिव) व बबलू जालिंदर शिंदे (रा. दसमेगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी त्यांच्या इतर साथीदारांसह हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. हे दोघे खामकरवाडी शिवारातील एका फटाक्याच्या कारखान्यावर काम करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी अनिल उर्फ शेड्या आबा काळे (रा. खामकरवाडी, ता. वाशी, जि. धाराशिव – फरार), शिवाजी संजय शिंदे (रा. खामकरवाडी, ता. वाशी, जि. धाराशिव – फरार) आणि अमोल रमेश शिंदे (रा. जानकीबार मागे, येरमाळा, ता. कळंब, जि. धाराशिव) यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. चोरलेली केबल विक्री करून मिळालेल्या रकमेपैकी 20 हजार रुपये पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून जप्त केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पाटोदा पोलीस ठाणे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि श्रीराम खटावकर, सुशांत सुतळे, पोह कॉ. सोमनाथ गायकवाड, मारुती कांबळे, राहुल शिंदे, बाळू सानप, आनंद मस्के तसेच इतर अधिकारी व कर्मचार्‍यांनी केली.

COMMENTS