Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किरकोळ अपघातातून तिघांची एसटी चालकाला बेदम मारहाण

अहमदनगर/प्रतिनिधी ः किरकोळ अपघातातून तिघांनी एसटी चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री माळीवाडा येथे घडली. कलीम मुन्शी सय्यद (वय 44,

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या वाढदिवसानिमित्त खेडमध्ये विविध उपक्रम
कोपरगाव मतदार संघातील रस्ते व पुलांसाठी ३.८४ कोटी निधी मंजूर:आमदार आशुतोष काळे
लिंपणगावमध्ये लाथा बुक्क्याने मारहाण करत शस्त्राने वार

अहमदनगर/प्रतिनिधी ः किरकोळ अपघातातून तिघांनी एसटी चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री माळीवाडा येथे घडली. कलीम मुन्शी सय्यद (वय 44, रा. बेलापूर खुर्द, ता. श्रीरामपूर) असे मारहाण झालेल्या चालकाचे नाव आहे. त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तीन अनोळखी व्यक्तींविरुध्द सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सय्यद हे एसटीच्या शिवाजीनगर (पुणे) आगारात काम करतात. ते दररोज पुणे ते औरंगाबाद नगर मार्गे बसच्या फेर्‍या करीत असतात. ते सोमवारी विनावाहक शिवनेरी बस (एमएच 11 टी 9256) ही बस पुणे येथून घेऊन औरंगाबादकडे जात असताना माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ बसच्या पाठीमागून एक चारचाकी वाहन चिकटले होते. तेव्हा चारचाकीचा चालक खाली उतरून सय्यद यांना म्हणाला, ‘माझ्या गाडीचे नुकसान झाले आहे’, सय्यद यांनी खाली उतरून पाहणी केली असता गाडीचालक व त्याच्यासोबतच्या इतर दोघांनी काही न विचारता सय्यद यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांनी शिवनेरी बसची चावी काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना सय्यद यांनी विरोध केला. तेव्हा देखील सय्यद यांना शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

COMMENTS