Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच ठरणार

खासदार शरद पवारांची बोचरी टीका

अकोला ः आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयानंतर अजित पवार मुख्यमंत्री होणार असे बोलले जात असले तरी, अजित पवारांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न दिवास्वप्

तुमच्या घरी छापे पडल्यानंतर पक्षाने काय करायचे?
सरकारला किंमत मोजावी लागेल
राजधानीत प्रफुल्ल पटेल आणि शरद पवारांची भेट

अकोला ः आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयानंतर अजित पवार मुख्यमंत्री होणार असे बोलले जात असले तरी, अजित पवारांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न दिवास्वप्न ठरणार असून, ते प्रत्यक्षात घडणार नाही, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. ते अकोला येथील दौर्‍याच्या वेळी माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलतांना पवार म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्यास आम्ही सकारात्मक आहोत. त्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. तसेच जर अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मी स्वत: त्यांना हार घालेन असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्याबाबत शरद पवारांना विचारण्यात आले. त्यावर बोलतांना पवार म्हणाले, हे स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात घडणार नाही. जनमानसात आम्हाला मिळणारा प्रतिसाद मतांत परिवर्तित झाला तर आमची सत्ता येईल. सुप्रिया सुळेंना पक्षाध्यक्ष करा हा छगन भुजबळांचा प्रस्ताव होता. मी उद्योगपती गौतम अदाणी यांच्या औषधाच्या कारखान्याच्या उद्घटनाला गेलो. सार्वजनिक कार्यक्रमात जावे लागते. अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्न. देशात अनेक भागात भाजप नाही. मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर तोडगा काढणे ही सरकारची जबाबदारी आहे, आमची नव्हे. भुजबळांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना जास्त महत्व देण्याची गरज नाही. आमची भूमिका स्वच्छ. पक्षात फूट आम्ही पाडली नाही. आम्हाला खात्री आहे की आम्हाला आमचा पक्ष म्हणून आमचे म्हणणे मांडण्याची संधी मिळेल. उद्या कुणी युनायटेड नेशन्सचा अध्यक्ष म्हणून पत्र लिहील. आमची भूमिका स्पष्ट आहे पक्षात फूट आम्ही पाडली नाही, असे शरद पवार म्हणाले.

वंचितला इंडिया आघाडीत घेण्यासाठी सकारात्मक – खासदार शरद पवार यांनी इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला घेण्याबाबत भाष्य केले. प्रकाश आंबेडकरांनी यापूर्वी काय झाले याचा विचार न करता पुढचा विचार करावा, की त्यांना आघाडीत यायचे आहे का? प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीच्या पुढील बैठकीला असतील की नाही ते आघाडी आणि प्रकाश आंबेडकर ठरवतील. आमचा आग्रह हाच असणार आहे की जे तीन पक्ष एकत्र आलो आहोत त्यांचेच सरकार येईल. प्रकाश आंबेडकरांना इ़ंडिया आघाडीत घेण्यास आम्ही सकारात्मक आहोत. त्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.

COMMENTS