Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवटीतील दुसरा अर्थसंकल्प आज होणार सादर

ठाणे प्रतिनिधी - ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवटीतील दुसरा अर्थसंकल्प आज सादर होत आहे.  २०२२ -२३ चा 3900 कोटी  सुधारीत तर २०२३-२४ चा मुळ अर्थ

महावितरणमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी
पीएच.डी फेलोशीपचा पेपर पुन्हा फुटला
वंचितांचा नायक  

ठाणे प्रतिनिधी – ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवटीतील दुसरा अर्थसंकल्प आज सादर होत आहे.  २०२२ -२३ चा 3900 कोटी  सुधारीत तर २०२३-२४ चा मुळ अर्थसंकल्प हजार कोटीं ने वाढीव अर्थ संकल्प ठामपा आयुक्त अभिजीत बांगर हे सादर करणार आहे. सध्या महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट लागू असल्यामुळे स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभे ऐवजी आयुक्त थेट अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आयुक्त अभिजीत बांगर ठाणे महापालिकेतील त्यांच्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. राज्यात सत्तांतर होऊन मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या रूपाने एक ‘ठाणेदार’ विराजमान झाल्यानंतर ठाण्याच्या विकासालाही चालना मिळाली असुन याचे प्रतिबिंब ठाणे महापालिकेच्या आजच्या अर्थसंकल्पातही उमटण्याची चिन्हे आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील विकासकामांसाठी राज्य शासनाकडून तब्बल १५०० कोटींच्या अनुदानाला मंजुरी देण्यात आली आहे. तेव्हा, कोट्यवधींच्या शासन अनुदानामुळे मागील काही वर्षीच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प बिग बजेट ठरणार आहे. आयुक्त डॉ. विपीन शर्मा नंतर अभिजित बांगर यांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. ठाणे परिवहन चा देखील अर्थ संकल्प सादर होत आहे. राज्य शासनाकडून आलेल्या निधीतून शहरात रस्ते, सुशोभीकरण, सौंदर्य करण, स्वच्छता, खड्डे ,सार्वजनिक शौचालय दुरुस्ती अशी कामे सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या या प्रकल्पांची छाप अर्थसंकल्पात दिसून येईल.

COMMENTS