Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी गृहमंंत्री देशमुखांना नागपूरला जाण्यास परवानगी

मुंबई/प्रतिनिधी ः भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी 13 महिन्यानंतर कारागृहातून सुटका झालेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाने

आदिवासी युवकास मारहाण
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांना ईडीची नोटीस
फडणवीस यांचे नेतृत्व आता केंद्रातही !

मुंबई/प्रतिनिधी ः भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी 13 महिन्यानंतर कारागृहातून सुटका झालेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाने अटीशर्तीसह चार आठवड्यांकरता नागपूरला जाण्यास परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशमुखांना दिलासा मिळाला आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांतर्गत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 27 डिसेंबर 2022 रोजी तब्बल 13 महिन्यांनी उच्च न्यायालयाने 1 लाखांच्या जातमुचलक्यावर विविध अटीशर्तीसह सुटका केली होती. अटीशर्तीनुसार, देशमुखांनी त्यांचा पासपोर्ट तपास यंत्रणांकडे जमा करवा, तपास यंत्रणा आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश आणि मुंबई सोडून जाऊ नये, तपास यंत्रणेला तपासात संपूर्णपणे सहकार्य करावे असे अनेक निर्देश दिले होते. आता देशमुखांनी सत्र न्यायालयात नव्याने अर्ज केला असून न्यायालयाने लादलेल्या अटीशर्तींमध्ये शिथिलता देण्याची विनंती अर्जात केली आहे.

नागपूर येथील कोटल देशमुखांना विधानसभा मतदार संघ आहे. स्थानिक रहिवासी आणि आमदार या नात्याने आपल्या विधानसभा मतदार संघातील लोकांसोबत संपर्कात राहणे त्यंच्याशी संबंध कायम ठेवणे आवश्यक आहे, त्यामुळे 4 आठवड्यांसाठी नागपूरला जाण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती देशमुखांनी अर्जात केली होती. त्या अर्जावर सोमवारी विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या समोर सुनावणी पार पडली. तेव्हा, देशमुखांचा अर्ज मान्य करून न्यायालयाने त्यांना 4 आठवड्यांसाठी नागपूरला जाण्यास परवानगी दिली. तसेच देशमुखांनी नागपूर येथील तपासयंत्रणांच्या कार्यालयातील हजेरी अनिवार्य असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

COMMENTS