Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाळेला गावाचा आधार आणि गावाला शाळेचा अभिमान वाटला पाहिजे ः अरुण भांगरे

संगमनेर ः ज्ञान वृद्धिंगत होण्यासाठी शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावते. विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षण दिशादर्शक ठरते. त

जामखेड शहरात नागरी सुविधांचा बोजवारा
पदोन्नती आरक्षण रद्दच्या त्या आदेशाला खंडपीठात आव्हान ; पारनेरच्या आंबेडकरांची जनहित याचिका
शेवगावात बदलापूर घटनेचा निषेध

संगमनेर ः ज्ञान वृद्धिंगत होण्यासाठी शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावते. विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षण दिशादर्शक ठरते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घडविणार्‍या शाळा भौतिकदृष्ट्या व शैक्षणिक दृष्ट्या विकसित झाल्या पाहिजेत. त्यासाठी शाळेला गावाचा आधार आणि गावाला शाळेचा अभिमान वाटला पाहिजे. धांदरफळच्या देशमुख मळा शाळेने  उपक्रमशील शिक्षकांच्या उपक्रमांमधून आणि लोकसहभागातून केलेली प्रगती ही शिक्षण क्षेत्रात राज्यासाठी दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन संगमनेर डाएटचे अधिव्याख्याता अरुण भांगरे यांनी केले.
        मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये द्वितीय क्रमांकाद्वारे दोन लाखाचे बक्षीस पटकावणार्‍या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देशमुख मळा येथे उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांना 32 डिजिटल पाट्या वितरित केल्या, त्याप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश देशमुख तर व्यासपीठावर सरपंच उज्वला नवनाथ देशमाने, उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग, अरविंद सगभोर, अशोक देशमुख, मुख्याध्यापक हनुमंत अडांगळे, अर्चना नाईकवाडी, रुपाली नाईकवाडी, तेजस्विनी देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात अरुण भांगरे पुढे म्हणाले की आपल्याला जीवनामध्ये खर्‍या अर्थाने पुढे जायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. देशमुख मळा शाळेने शिक्षण क्षेत्रात जे योगदान दिलेले आहे ते खरोखर राज्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी दिशादर्शक आहे. याप्रसंगी शिक्षिका वृषाली कडलग यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ग्रामस्थांनी शाळेसाठी दिलेल्या योगदानाचा त्यांनी उल्लेख केला. याप्रसंगी अक्षय खतोडे, संदीप बाळासराफ,अर्चना नाईकवाडी, तेजस्विनी देशमुख, रूपाली नाईकवाडी, अनिता हिरे, वैशाली देशमुख, सचिन कचेरिया, साधना गाडेकर, मच्छिंद्र लकारे आदी उपस्थित होते. डिजिटल पाट्या मिळाल्याबरोबर विद्यार्थ्यांचे चेहरे हरखून गेले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय खतोडे यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक हनुमंत अडांगळे यांनी केले.

COMMENTS