दिल्लीच्या कर्तव्यपथावर झळकणार ‘साडे तीन शक्तीपीठ’ चा देखावा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिल्लीच्या कर्तव्यपथावर झळकणार ‘साडे तीन शक्तीपीठ’ चा देखावा

यवतमाळच्या पाटणबोरीत तयार झालीत झाकीतील शिल्पे

यवतमाळ प्रतिनिधी - राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात महाराष्ट्रातील साडे तीन शक्तीपीठ आणि नारी शक्ती ही थीम चलचित्र देखा

जयंत पाटील यांनी सदस्य नोंदणी आणि संघटनात्मक कामकाजाचा घेतला आढावा 
वाचकांकडून वृत्तपत्र विक्रेत्याचा सन्मान
राफेलवरून मोदी सरकारच्या अडचणीत वाढ !

यवतमाळ प्रतिनिधी – राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात महाराष्ट्रातील साडे तीन शक्तीपीठ आणि नारी शक्ती ही थीम चलचित्र देखावा साकारला जाणार आहे. विशेष म्हणजे या चलचित्र देखाव्यावरील संपूर्ण शिल्प यवतमाळ जिल्ह्यातील  पाटणबोरी येथिल यशवंत  येनगूटीवार यांनी तयार केली आहेत. त्यामूळे पाटणबोरीचे नाव राजधानी दिल्लातही कोरले जाणार आहे. 

महाराष्ट्रातील कोल्हापूर, तुळजापूर, माहुर व वणी येथील देवींच्या साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन चित्ररथाद्वारे पथसंचलनात होणार आहे. सर्व शिल्प  केळापूर तालुक्यात असलेल्या पाटणबोरी येथील यशवंत एनगुटीवार या शिल्पकाराने साकारली आहे. यशवंत यांना पिढीजात मूर्ती कलेचा वारसा लाभला आहे.   महाराष्ट्र नव्हे तर देशाबाहेर अमेरिका ऑस्ट्रेलिया कॅलिफोर्निया दुबई तसेच श्रीलंका येथे त्यांनी विविध शिल्प साकारून पाठविले आहे. पिढी जात मूर्ती कलेला तांत्रिक व तर्कशुद्ध शिक्षणाची जोड मिळावी म्हणून मुंबई येथील जे जे स्कूल ऑफ आर्ट येथे उच्च शिक्षण घेतले आहे. बहुतांश शिल्पांची उंची सहा फूट ते नऊ फुटांपर्यंत राहणार आहे. विशिष्ट फायबर पासून ही शिल्प तयार करण्यात आली आहे. अल्पकालावधीत म्हणजे केवळ दहा दिवसांच्या अंतरात ही सर्व शिल्प साकारण्यात आली आहे.

COMMENTS