देशातील वाढते अपघाताचे प्रमाण चिंताजनक असून, दहशतवादी कारवायांमुळे होणार्या मृत्यूपेक्षा अपघातात मृत्यू पावणार्यांची संख्या अधिक आहे. देशात दरवर्षी
देशातील वाढते अपघाताचे प्रमाण चिंताजनक असून, दहशतवादी कारवायांमुळे होणार्या मृत्यूपेक्षा अपघातात मृत्यू पावणार्यांची संख्या अधिक आहे. देशात दरवर्षी दीड लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. अर्थात हे अपघात होण्यामागे मानवी चुका मोठया प्रमाणांवर आहे. मानवी चुका म्हणजेच, ज्याप्रमाणे वाहनचालकांच्या चुका होतांना दिसून येत आहे. त्याचप्रकारे रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, धोक्यांच्या फलकांची उणीव, रात्री रस्त्याच्या पट्ट्याच न दिसणे, प्रखर दिव्यांचा वापर अशी अनेक कारणे आहेत. रस्ते चांगले झाल्याचा परिणामही काही ठिकाणी अपघात वाढण्यात झाला आहे. धोकादायक वळणे कमी करण्याचा प्रयत्न रस्ते बांधकाम विभागाने केलेला नाही. त्यामुळेही अपघात वाढतात. रस्त्यांवर किती वेगाने वाहन चालविले पाहिजे, याची नियमावली असताना ती कुणीच पाळत नाही. अति घाई संकटात नेई, असा अनुभव पदोपदी येत असूनही त्यातून कुणी काही धडा घेत आहे, असे दिसत नाही. देशात दंगल, नक्षलवाद, हाणामार्या, अतिरेकी हल्ले यात जेवढे लोक दरवर्षी मृत्युमुखी पडतात, त्यापेक्षा कितीतरी अधिक लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. देशभरात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणार्यांची संख्या मोठी आहे. दरवर्षी सुमारे दीड लाख नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो, ही बाब चिंताजनक आहे. रस्ते अपघात रोखणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे मोटार वाहन कायदा दुरुस्ती विधेयक केंद्र सरकारने मंजुर केले आहे. विविध राज्यांनी हा कायदा स्वीकारला असला, तरी देखील अपघातात कमी झाल्याचे दिसून येत नाही. कायदा झाला, मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होतांना दिसून येत नाही. किंवा तशी शिस्तच आपण आपल्याला लावून घेत नाही. परिणामी अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढतांना दिसून येत आहे.
केेंद्रीय रस्ते मंत्री पदाचा कार्यभार घेतल्यानंतर नितीन गडकरी यांनी मोठया प्रमाणांवर सुधारणा केल्या असून, अपघाताचे प्रमाण कमी करणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. देशभरात 30 टक्के वाहन परवाने बनावट आहेत. परिवहन हा जरी राज्य सरकारांचा विषय असला, तरी संबंधित विभागाने असे गैरप्रकार रोखण्यासाठी काय केले आणि तसे ते केले नसेल, तर केंद्र सरकारने संबंधित राज्यांच्या परिवहन खात्याची झाडाझडती का घेतली नाही, असे प्रश्न उपस्थित होतात. या सर्व बाबी सरकारने छायांकित करून किंवा चिन्हांच्या साह्याने दर्शविले पाहिजे. जेव्हा लाल सिग्नल पडतो तेव्हा वाहन चालविण्यास मनाई असते परंतु अशा स्थितीतही वाहन चालक कायद्याचे भान न ठेवता सरळ, बेधडक डाव्या बाजूने निघून जातो. अनेकदा महानगरांमध्ये, शहरांमध्ये एका बाजूनेच जाण्यासाठी मार्ग असतो तसेच जाण्याचा मार्ग लांबच्या लांब असल्यामुळे मध्ये कुठे वळता न आल्यामुळे वाहन चालक त्याच मार्गाने सरळ उलट दिशेने परत येतो अशा परिस्थितीत अपघात होण्याची खूप जास्त शक्मयता असते. ह्या गोष्टींची वाहन चालकाने निश्चितच काळजी घेतली पाहिजे. एकदा देशभर लागू करण्यात आलेला कुठलाही कायदा असो त्याचे पालन झालेच पाहिजे. वाहन चालकाने वाहन चालवताना मर्यादेपेक्षा जास्त वेगाने चालवू नये. नुकतीच घडलेली घटना म्हणजे बार्शी येथून निघालेले जलसंधारण मंत्री यांच्या गाडीने एका भाजीपाला विकत असलेल्या तरुणाला उडविले. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अशाप्रकारे देशातील कुटुंबाचे कुटुंब, घरचे घर उजाड होत चाललेले आहे. ही आपल्या देशासाठी एक चिंतेची बाब आहे आणि दिवसेंदिवस रस्त्यावर अपघाताची संख्या वाढतच चाललेली आहे. तरी वाहन चालकांनी आपण वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, नशेमध्ये वाहन चालविणे, सिग्नल तोडून वाहन चालविणे किंवा प्रवेश नसलेल्या भागातून वाहन चालविणे या सर्व बाबी कटाक्षाने टाळून आपल्या हातून अपघात होणार नाही आणि सदोष व्यक्तीचे बळी जाऊन आपण स्वतः त्याचे गुन्हेगार होणार नाही एवढी मात्र खबरदारी घेतली पाहिजे. देशात सर्वप्रथम लागू करण्यात आलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.
COMMENTS