Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सूर्यतेज’ घर तेथे रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर

कोपरगाव ः कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेच्या वतीने कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत दीपावली-पाडवा घर तेथे रांगोळी स्पर्धा 2023 या स्पर्धेचा निकाल खालील

कोपरगाव सबजेलमध्ये कैद्यांनी घातला राडा
व्यापार्‍यासह ट्रकचालकास चौघांकडून मारहाण व धमकी
पाथर्डी शेवगाव महसूल विभागाच्या क्रीडा स्पर्धेला कर्मचाऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

कोपरगाव ः कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेच्या वतीने कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत दीपावली-पाडवा घर तेथे रांगोळी स्पर्धा 2023 या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे जाहीर करत असल्याची माहिती परिक्षण समिती प्रमुख कल्पना हेमंत गिते यांनी दिली आहे. सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे परंपरेनुसार याही वर्षी दीपावली-पाडवा निमित्त ’घर तेथे रांगोळी’ स्पर्धेचे आयोजन याही वर्षी कुठलेही प्रवेश शुल्क न आकारता सहभागी स्पर्धकांच्या घरासमोरील अंगणात मंगळवार 14 नोव्हेंबर 2023 रोजी परंपरेनुसार याही वर्षी दीपावली-पाडवा निमित्त ’घर तेथे रांगोळी’ स्पर्धेचे 11 व्या वर्षी आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेसाठी पारंपारिक, निसर्गचित्र, व्यक्तीचित्र, सामाजिक विषय, व्यंगचित्र असे पाच विषय ठेवण्यात आले होते. शेकडो स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. पारंपरिक रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक (पैठणी, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र) रिद्धी चव्हाण, विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र) विद्या खर्डेकर, भाग्यश्री भोईर, रुपाली आदमाने, इशा सरोदे, रुपाली मोरे, पायल जोशी, गौरी माळी, आदित्य घोरपडे, दिपाली जाधव, गयाबाई डगळे, गायत्री खोसे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. निसर्ग चित्र रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक  (पैठणी, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र) मनिषा डोंगरे, विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र) चैताली सपकाळ, ओवी भांडगे, मोनिका भांडगे, गीतांजली कांबळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. व्यक्तिचित्र रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक (पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) रुतुजा बो-हाडे, विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र) कल्याणी आव्हाड, चंद्रा इच्चे, शिल्पा नेने, मंजुषा आदिक, वैष्णवी पहिलवान, ऋचा नेने, आरती बाविस्कर, दिव्या बाविस्कर, रुतुषा आहेर, प्रांजल रोकडे, उज्वला दिमोटे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. सामाजिक विषय रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक  (पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) सविता धुमाळ, विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) रुतुजा भोसले, मानसी उपाध्याय, अश्‍विनी मोरे, प्रिशा बजाज, मंगला चिखले, वृषाली खैरनार, सुरेखा लांडगे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. व्यंगचित्र रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक  (पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) साक्षी निकुंभ, विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र) भाग्यश्री घोडके, वैष्णवी वाणी, मानसी माळोदे, अक्षय आहेर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. भौमितिक रांगोळी विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र) साक्षी निकुंभ, नेतल लाहोटी यांना सन्मानित करण्यात येणार आहे. बक्षिस विजेत्यांचे सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके,परिक्षण सहाय्य समितीचे प्रा. अनिल अमृतकर, प्रा. अतुल कोताडे, प्रा.मतीन दारुवाला, प्रा. प्राजक्ता राजेभोसले, प्रा. ऋतुजा कोळपकर, प्रा. वंदना अलई, सूर्यतेज सल्लागार समिती व सर्व सदस्यांनी यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS