शिवलिंगावर बर्फ जमा झाल्याचा बनाव चौकशी समितीच्या अहवालात उघड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवलिंगावर बर्फ जमा झाल्याचा बनाव चौकशी समितीच्या अहवालात उघड

तिघा पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल

नाशिक प्रतिनिधी - त्र्यंबकेश्वर येथील शिवलिंगावर बर्फ जमा झाल्याचा बनाव चौकशी समितीच्या अहवालात उघड झाल्यानंतर तिघा पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्या

चार दहशतवाद्यांचा खात्मा ; एक जवान शहीद
 शहरातील परिस्थिती शांत आहे, अफवावर विश्वास ठेवू नये – आस्तिक कुमार पांडे  
भीषण दुर्घटना ! अख्खं घर थेट ७० फूट खोल जमिनीत गेले.

नाशिक प्रतिनिधी – त्र्यंबकेश्वर येथील शिवलिंगावर बर्फ जमा झाल्याचा बनाव चौकशी समितीच्या अहवालात उघड झाल्यानंतर तिघा पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात शिवलिंगावर बर्फ जमा झाल्याचा व्हिडिओ गेल्या  ३० जून रोजी  समाजमाध्यमांवर प्रचंड वायरल झाला होता. हा बर्फाचा थर जमा होणे दैवी संकेत, चमत्कार असल्याचा दावा करणारा असल्याचे भासवण्यात आले होते. हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर अनेक भाविकांनी आस्थेने दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर येथे धाव घेतली होती. मात्र या व्हिडिओच्या सत्यतेबद्दल शंका उपस्थित होत होत्या. मंदिर प्रशासनानेही या व्हिडिओची पुष्टी केलेली नव्हती. मंदिर प्रशासनातर्फे या व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या चौकशीत एक पुजारी तसेच त्याचे दोन सहकारी यांनीच हा बर्फ शिवलिंगावर ठेवल्याचे निष्पन्न झाल्याने या तिघांविरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  लोकांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्या पुजारी तसेच त्याच्या सहकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी संशयितांविरुद्ध जादूटोणा विरोधी कायद्याची कलमे लावण्याची मागणी अंनिसने केली आहे. या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असूनही गुन्हा दाखल करण्यास सात महिन्यांचा वेळ का लागला ? असाही प्रश्नही अंनिसने उपस्थित केला आहे. अंनिसच्या वतीने जिल्हाधिकारी, नाशिक, त्र्यंबकेश्वर पोलीस निरीक्षक यांना वरील मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

COMMENTS