चार दहशतवाद्यांचा खात्मा ; एक जवान शहीद

Homeताज्या बातम्यादेश

चार दहशतवाद्यांचा खात्मा ; एक जवान शहीद

बारामुल्ला भागात दहशतवाद्यांशी चकमक

श्रीनगर/वृत्तसंस्था : दहशतवाद्यांकडून सातत्याने जम्मू-काश्मीर खोर्‍यातील शांतता भंग करण्याच्या प्रयत्न सुरू असून, पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे

गृहविभाग येणार अ‍ॅक्शन मोडमध्ये ?
उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी विषारी नाग
भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक l LokNews24

श्रीनगर/वृत्तसंस्था : दहशतवाद्यांकडून सातत्याने जम्मू-काश्मीर खोर्‍यातील शांतता भंग करण्याच्या प्रयत्न सुरू असून, पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लघंन सुरू असल्याच्या घटना समोर येतांना दिसून येत आहे. बुधवारी जम्मू काश्मीरमध्ये 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले असून, या घटनेत एक भारतीय जवानाला वीरमरण प्राप्त झाले आहे.
गेल्या काही दिवसाआधी दहशतवाद्यांनी 12 मे रोजी बडगाममध्ये काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. बडगाम जिल्ह्यातील चदूरा तहसीलमध्ये महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असलेला राहुल त्याच्या कार्यालयात उपस्थित असताना दहशतवाद्यांनी ही घटना घडवून आणली. या घटनेनंतर संपूर्ण काश्मीरमध्ये खळबळ उडाली होती. तर त्यानंतर
दहशतवाद्यांनी पुन्हा हल्ला करत एक जम्मू-काश्मीर पोलीस हवालदार आणि त्याच्या मुलीला गोळ्या घातल्या होत्या. ज्यात गंभीर जखमी झालेला जवानाला विरमरण आले, तर त्यांची मुलगी जखमी झाली आहे. त्यमुळं सध्या वाढलेल्या जम्मू काश्मीरमधील कारवायांना रोखण्याचं तगडं आव्हानं सध्या जम्मू काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सुरक्षा बलाच्या जवानांसोबत तिथल्या प्रशासकीय यंत्रणेसमोरही उभं ठाकलंय. जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला भागातील खिरीजवळ सुरक्षा दल आणि अतिरेकी यांच्यात चकमकीस प्रारंभ झाला आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. सुरक्षा दलाने संपूर्ण परिसर घेरला असून या चकमकीच्या वेळी एक भारतीय जवान शहीद झाला आहे. तर यावेळी सुरक्षा दलांनी दिलेल्या जोरदार प्रतित्योरात 4 अतिरेक्यांचा खात्मा झाला आहे. तर या परिसरात अजूनही काही दहशतवादी लपल्याची भीती व्यक्त केली जात असून पोलीस आणि सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. दरम्यान मंगळवारी (24 रोजी) जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात एक जम्मू-काश्मीर पोलीस हवालदार आणि त्याच्या मुलीला गोळ्या घालण्यात आल्या होत्या. तर गोळीबारात गंभीर जखमी झालेला जवानाला विरमरण आले. तसेच त्यांची मुलगी जखमी झाली असल्याचे काश्मीर पोलिसांनी माहिती दिली होती. तसेच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगर जिल्ह्यातील सौरा भागात हा दहशतवादी हल्ला झाला. सैफुल्लाह कादरी असे या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसाचे नाव आहे. तो श्रीनगरमधील मलिक साब परिसरातील रहिवासी होता.

COMMENTS