Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे निलंबित

17 कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी कारवाई

पुणे/प्रतिनिधी ः पुणे जिल्ह्यातील खेडच्या तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांना निलंबित करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहे. वाघमारे यांनी 17 कोटी

नाशिक व मालेगाव येथे औद्योगिक वीजग्राहकांसाठी ‘स्वागत सेल’ कार्यान्वित
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न
मनसेला भोंगाविरोधी भूमिकेमुळे गळती

पुणे/प्रतिनिधी ः पुणे जिल्ह्यातील खेडच्या तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांना निलंबित करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहे. वाघमारे यांनी 17 कोटी 56 लाख रुपयांचे शासकीय महसुलाचे नुकसान केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत.त्यांच्यावरील या कारवाईने मात्र शेतकर्‍यांनी मात्र आनंद व्यक्त केला आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांनी यासंदर्भात पुणे जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती.
खेड तहसीलदार पदावर कार्यरत असताना वाघमारेंनी काही प्रकरणांत वादग्रस्त निर्णय घेतल्याचे आरोप करण्यात आले होते. या प्रकरणी भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे पुणे जिल्हा संघटक बाळासाहेब चौधरी यांनी त्यांच्या विरुद्ध दफ्तर तपासणी करण्याची मागणी पुणे जिल्हाधिकार्‍यांकडे मे 2022 मध्ये केली होती. या तपासणीत वाघमारेंनी तब्बल 29 प्रकरणांमध्ये त्रुटी असल्याचे नमूद करत सप्टेंबर 2022 मध्ये अहवाल सादर केला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने खेड उपविभागीय अधिकार्‍यांना वाघमारेंनी कामात केलेली अनियमितता आणि गैरकारभारांबाबत दोषारोप ठेवण्याचे आदेश दिले. आरोपपत्रात वाघमारेंनी विविध आदेश मंजूर करताना नजराणा रक्कम भरून न घेतल्याने आणि गौणखनिजाचे आदेश पारित करताना योग्य कारणमीमांसा न करता दंड माफ केल्याने शासनाचे 17 कोटी 56 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्याता आला. त्यानंतर राज्य सरकारने 4 सप्टेंबर रोजी वाघमारेंच्या निलंबनाचा आदेश काढला. खेड तहसीलदार पदावरून नुकतीच वाघमारेंची बदली झाली होती. पण त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातून आदेशास स्थगितीही मिळविली. पण उच्च न्यायालयाने मॅटच्या आदेशाला स्थगिती दिल्याने पुन्हा त्यांची बदली झाली होती.

COMMENTS