Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री शिंदे तीन दिवसाच्या सुटीवर ?

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात सत्ता-संघर्षाचा कधीही कोणत्याही क्षणी येवू शकतो, त्याचबरोबर राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू असतांनाच, मुख्यमंत्

ओबीसींचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देणार ः मुख्यमंत्री शिंदे
कोणती भाकरी फिरवायची ते पवारांनाच विचारा ः मुख्यमंत्री शिंदे
आरक्षणावरून संभ्रम करू नका ः मुख्यमंत्री शिंदे

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात सत्ता-संघर्षाचा कधीही कोणत्याही क्षणी येवू शकतो, त्याचबरोबर राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू असतांनाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस सुटीवर गेल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी या सुटीची अधिकृत माहिती दिली नाही.
मुख्यमंत्री शिंदे हे 24 ते 26 एप्रिल दरम्यान सुटीवर असल्याचे समजते. त्यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांसोबत एक बैठक घेतली. त्यानंतर आपण सातारा जिल्ह्यातल्या आपल्या गावी जात असल्याचे यावेळी कर्मचार्‍यांना सांगितले. त्यांच्या गावी ते पूजा-अर्चा करण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले आहे. एकीकडे अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा, त्यांनी मुख्यमंत्री होण्याची बोलून दाखवलेली उघड इच्छा, सत्तासंघर्षाचा निकाल केव्हाही येण्याची शक्यता. या सार्‍या घडामोडीत मुख्यमंत्री सुटीवर गेल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पडद्याआडून हालचाली सुरू असून, त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे तणावात असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर सत्तासंघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केव्हाही येऊ शकतो. त्या पार्श्‍वभूमीवर हा निकाल आपल्या बाजून लागावा, यासाठी एकनाथ शिंदे गावातल्या देवीला साकडे घालणार असल्याचे समजते. शिवाय राजकीय कोलाहलातून थोडी विश्रांती हा सुद्धा त्यामागचा हेतू आहे. अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला, तर भाजप अजित पवारांना सोबत घेणार असल्याची चर्चाय. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याचे समजते. ते त्यांना उघडपणे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनी हा पर्याय निवडल्याचे समजते.

COMMENTS