https://www.youtube.com/watch?v=etVlrAz8ql8 गडचिरोली : नागपुरातील बारमध्ये बसून शासकीय दस्तावेज आणि फाईलवर सही करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्
गडचिरोली : नागपुरातील बारमध्ये बसून शासकीय दस्तावेज आणि फाईलवर सही करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. गडचिरोलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे चामोर्शी येथील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के यांच्या निलंबनाचा आदेश शासनाने काढला आहे. गडचिरोलीच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांनी त्यांना निलंबित केल्याची माहिती दिली आहे. नागपुरातील एका बार आणि रेस्टॉरंटमधील टेबलवर महाराष्ट्र शासन असा उल्लेख असलेल्या फाईल ठेवून एक अधिकारी दारू ढोसत होता. त्याच्या एक व्हिडीओ व्हायरल झाला. या प्रकरणात शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश सरकारने दिले.

COMMENTS