Homeताज्या बातम्यासंपादकीय

पक्षांच्या समर्थन-विरोधात जनता नाही ! 

राजकीय स्थित्यंतरे : भाग - २

वर्तमान केंद्र सरकारने देशातील वीस राज्य सरकारे पाडल्याचा आरोप संसदेच्या नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी

संवाद हरवल्याने काँग्रेसची वाताहात!
शाक्तपंथी छत्रपती संभाजी महाराज ! 
भक्ताडाला हौस असेल, तर, होऊन जाऊ द्या चौकशी, भुजबळांची अन् आमचीही ! 

वर्तमान केंद्र सरकारने देशातील वीस राज्य सरकारे पाडल्याचा आरोप संसदेच्या नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. खासदार सुप्रिया सुळे यांनी हा आरोप तेव्हाच केला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटात विभागला गेला; ज्यातील एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गट-भाजप आघाडीच्या सरकारमध्ये सामील झाला. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट ही खऱ्या अर्थाने फूट नव्हे, असा सर्वसामान्यांचा आजही कयास  आहे. अर्थात यात तथ्य असण्याची तीन कारणे जी प्रमुख आपल्याला दिसतात, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट ही एक प्रकारे पक्ष वाचविण्याची रणनीतीचा भाग आहे, असं म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा वेळी फुटला की, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत राष्ट्रवादी काँग्रेसवरचे आरोपच बोलून दाखवले होते. अगदी, त्याच्या दुसऱ्या दिवशीच ही फूट पडली. या फूटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला तोट्याऐवजी फायदाच झाला. राष्ट्रवादी काँग्रेसला यामुळे तीन फायदे झाले. त्यातील पहिला फायदा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांवर विशेषतः अजित पवार यांच्या विरोधातच गुन्हा दाखल होऊन कारवाई होण्याची शक्यता होती, त्यातून सुटका होत थेट सत्ता हातात घेतली. दुसरा फायदा याचा असा झाला की, महाराष्ट्रामध्ये भारत राष्ट्र संघ म्हणजे बीआरएस या चंद्रशेखरराव यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची घोडदौड सुरू झाली होती, जी शेतकरी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात शिरकाव करत होती, त्या बाबीला ताबडतोब पायबंद घातला गेला. कारण, शरद पवार हेच थेट पक्ष फूटीनंतर नव्याने पक्ष उभारण्यासाठी मैदानात उतरले. याचा तिसरा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला जो झाला तो म्हणजे त्यांच्यापूर्वी शिवसेना या पक्षामध्ये जी फूट पडली होती, त्या अनुषंगान उद्धव ठाकरे यांना जनतेची सहानुभूती निर्माण झाली होती. ती सहानुभूतीची लाट एवढी मोठी होती की, शिवसेना हा महाराष्ट्रात आणखी ताकदवर म्हणून उभा राहणारा पक्ष दिसू लागला. त्यातूनच शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या सहानुभूतीतून आपल्याही सहानुभूतीचा हिस्सा खेचून आणला. हे तीन फायदे राष्ट्रवादी काँग्रेसला सरळ मिळाले होते. या फायद्याच्या गणिताबरोबर आपण जर त्यापूर्वी फुटलेल्या शिवसेनेचा विचार केला, तर शिवसेनेला देखील यामुळे फायदा झाला. कारण, मोठ्या प्रमाणात जनतेच्या सहानुभूतीची लाट, ही उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आली. त्यामुळे पक्ष फूटीनंतरही महाविकास आघाडीचे घटक दल म्हणून दोन पक्षांचे जे अंश उरले; त्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्यासोबत काँग्रेस, यांचे पारडे तरीही जड असल्याचे, अनेक सर्वेक्षणामधून दिसून आले. सर्वेक्षणांमधील आकडेवारी ही किती विश्वासार्ह आहे, हा जरी भाग आपण बाजूला ठेवला तरी एकंदरीत जनतेचा विचार करण्याचा आजचा रोख, राजकीय पक्षांच्या अनुषंगाने ठरत नसून प्रत्यक्षात जनता अनुभवत असलेल्या वस्तुस्थिती वरून ठरत आहे. आपण पाहिलं तर, निश्चितपणे महागाई ही एवढ्या उंचीवर गेली आहे की, सर्वसामान्य माणसाच्या ते आवाक्या बाहेर झालेले आहे. महागाईचा प्रचंड शॉक जनतेला लागला आहे!  जनता थेट सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेली आहे. पण, वर्तमान काळात केंद्राच्या सत्तेत भारतीय जनता पक्ष असल्यामुळे, जनता ही सत्ताधाऱ्यांच्या म्हणजेच पर्यायाने भाजपाच्या विरोधात केल्याचे दिसत असले तरी, जे पक्ष याविरोधात उभे राहत आहेत, त्यांनाही जनतेची सहानुभूती किंवा जनतेचा फार पाठिंबा आहे, असं समजण्याचं कारण नाही! कारण यापूर्वी याच पक्षांनी सत्तेत राहून जनतेची दिशाभूल केल्याचे जनता अद्यापही विसरलेले नाही!

COMMENTS