पंतप्रधान करणार नोएडा विमानतळाची पायाभरणी

Homeताज्या बातम्यादेश

पंतप्रधान करणार नोएडा विमानतळाची पायाभरणी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवार 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर, जेवार येथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळा

अनुष्का कुंभार यांचा जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून सत्कार
टोकियो ऑलिंपिकमध्ये पदक जिंकूनच महाराष्ट्राचे खेळाडू मायदेशी परत येतील – उपमुख्यमंत्री
राज्यात 27 डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवार 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर, जेवार येथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची (एनआयए) पायाभरणी करणार आहेत.
उत्तर प्रदेश हे पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले भारतातील एकमेव राज्य बनणार आहे.
संपर्क व्यवस्थेला (कनेक्टिव्हिटीला) चालना देणे आणि भविष्यासाठी सुसज्ज विमान वाहतूक क्षेत्र निर्माण करणे या पंतप्रधानांच्या संकल्पनेतून विमानतळ साकारणार आहे. उत्तर प्रदेश राज्यासाठी केंद्रीय भव्य ध्येयाअंतर्गत याची उभारणी होत आहे, नुकतेच उद्घाटन झालेले कुशीनगर विमानतळ आणि अयोध्या येथे निर्माणाधीन आंतरराष्ट्रीय विमानतळासह अनेक नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळांचा विकास हा याचाच साक्षीदार आहे. हे विमानतळ दिल्ली एनसीआर मध्ये येणारे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. यामुळे आयजीआय विमानतळावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. हे भौगोलिकदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी आहे. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, अलीगढ, आग्रा, फरीदाबाद या शहरांसह आणि शेजारच्या भागातील लोकांना सेवा देईल.

COMMENTS