Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

थेट गोदापात्रात शिरली प्रवासी बस

नाशिकच्या गाडगे महाराज पुलाखालील नदी पत्रात अडकली बस मोठी दुर्घटना टळली

नाशिक प्रतिनिधी  - प्रवासी बस गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्यात शिरून त्यात प्रवाशी अडकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच धावपळ उडाली होती.

अमिताभ बच्चन यांची नात नव्या लवकरच स्क्रीनवर दिसणार.
भाजीपाल्याचे दर कडाडले
इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार : अजित पवार

नाशिक प्रतिनिधी  – प्रवासी बस गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्यात शिरून त्यात प्रवाशी अडकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच धावपळ उडाली होती. नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. यातच पर राज्यातून प्रवाशांना घेऊन आलेल्या बसच्या चालकाने थेट गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यातूनच ही बस पुढे मार्गस्थ करण्याचा प्रयत्न केला मात्र अंदाज चुकल्याने गाडगे महाराज पुला खाली ही बस अडकून गेली आणि यात असलेले प्रवाशी देखील अडकून गेले होते. तात्काळ स्थानिक नागरिकांनी या बस मध्ये असलेल्या प्रावश्यांना बाहेर काढण्यासाठी मदत कार्य सुरू केले, त्यांनतर क्रेन च्या सहाय्याने ही प्रवाशी खाजगी बस गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आली. यावेळी बघ्यांची देखील मोठी गर्दी जमली होती.

COMMENTS