Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कांदा निर्यातबंदी दिल्लीश्‍वरांना उठवावीच लागेल

खासदार शरद पवारांचा इशारा ; रस्त्यावर उतरून केले आंदोलन

नाशिक ः कांदा निर्यातबंदी विरोधात राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. शरद पवार स्वतः रस्त्याव

राज्यपाल कोश्यारी यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या – शरद पवार
राज्यात भाजपविरोधात असंतोष ः शरद पवार
संजय राऊतांच्या ईडी कारवाई संदर्भात मनसे प्रवक्ते प्रकाश महाजनांचा गौप्यस्फोट.

नाशिक ः कांदा निर्यातबंदी विरोधात राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. शरद पवार स्वतः रस्त्यावर उतरत नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे सोमवारी रास्ता रोको आंदोलनात केले. यावेळी रास्ता रोको केल्याशिवाय दिल्लीला कळत नाही, दिल्लीश्‍वरांना कांदा निर्यातबंदी उठवावीच लागेल, असा इशारा देखील पवार यांनी यावेळी दिला.
नाशिक जिल्हा देशात शेतीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. घाम गाळून काळ्या आईशी इमान राखण्याची भूमिका तुम्ही घेतली. देशाच्या नकाशावर नाशिकच्या शेतकर्‍यांची नोंद झाली आहे. कांद्याच्या संदर्भात केंद्राने निर्णय घेतल्यावर मी अधिकार्‍यांची बैठक घेतली, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. शेतकर्‍यांच्या कष्टाला किंमत मिळत नाही, हे दुर्दैव आहे. मी कृषीमंत्री असताना कांद्याची किंमत कमी होणार नाही, हे स्पष्ट सांगितले होते. परंतु आताचे सरकार ते करु शकत नाही. रास्ता रोको केल्याशिवाय दिल्लीला कळत नाही. आता आंदोलनानंतर दिल्लीश्‍वरांना कांद्याची निर्यातबंदी उठवावीच लागणार आहे, असे शरद पवार म्हणाले. नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी आहे, त्याला 2 पैसे मिळण्याची संधी येत असते. केंद्राने निर्यात बंदीचा निर्णय घेतला त्यामुळे देशाच्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले. बाजार भाव देखील पडले, बाहेर देशात जाणारा माल देखील अडकला त्यांचे ही नुकसान झाले. संपूर्ण देशातील निर्यात थांबवली आहे, काही देशांनी याचा फायदा घेतला होताय. कांद्याची गरज आहे, पण भारत सरकार लोकांच्या दबावामुळे बंदी घालते, लोकांच्या शिव्या खाव्या लागतात पण इतर देशांना उत्पादन घेणे सुरू झाले त्यामुळे मध्ये-मध्ये असे निर्णय घ्यायला लावतात असेही शरद पवार म्हणाले. अतिवृष्टीने जे नुकसान झाले तेव्हा पाहणी करत असतांना त्यांनी 2 दिवसात मदत करू सांगितले पण दहा दिवस झाले अजून मदत झाली नाही. कांद्याचे उत्पादन हे महाराष्ट्रातील नाशिक मध्ये जास्त होते. याशिवाय साखरेचे सिरप घेऊन इथेनॉल नावाचे प्रोडक्ट बनवतो त्यावर सुद्धा बंदी घातली. सात डिसेंबर जी बंदी घातली, याची जबरदस्त किंमत उत्पादकांना मोजावी लागेल, असेही शरद पवार म्हणाले. द्राक्ष तयार झाल्यानंतर गारपीट झाली म्हणून द्राक्षाच्या मणी तुटला त्यामुळे त्याला किंमत मिळू शकत नाही. त्यामुळे द्राक्ष बागायतदार अडचणीत सापडला आहे. सरकारने यांना मदत दिली पाहिजे, मार्ग काढला पाहिजे असेही पवार म्हणाले.

COMMENTS