Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आयुर्वेद महाविद्यालय व चिकित्सालयामधील शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी पुकारले कामबंद आंदोलन

23 वर्षापासुन पगारवाढ व इतर मागण्यांकडे संस्थेचे व्यवस्थापकीय मंडळ व प्रशासकीय मंडळाचे दुर्लक्ष

देवळाली प्रवरा /प्रतिनिधीः राहरी फॅ क्टरी येथील श्री विवेकानंद नर्सिंग होमचे आयुर्वेद महाविद्यालय व चिकित्सालयामधील शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी एकञ

स्थानिकांच्या सहभागातून रयतचा विकास वाढवा ः चंद्रकांत दळवी
दैनिक लोकमंथन ; केंद्राचे आणखी एक आर्थिक पॅकेज
ओव्हरलोड वाहनावर कडक कारवाई करणार्‍या महिला उप प्रादेशिक अधिकार्‍यास दमदाटी

देवळाली प्रवरा /प्रतिनिधीः राहरी फॅ क्टरी येथील श्री विवेकानंद नर्सिंग होमचे आयुर्वेद महाविद्यालय व चिकित्सालयामधील शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी एकञ येत काम बंद आंदोलनास सुरवात केली आहे.गेल्या 23 वर्षापासुन पगारवाढ व इतर मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करुनही संस्थेचे व्यवस्थापकीय मंडळ व प्रशासकीय मंडळ दुर्लक्ष करीत असल्याने कामगारांवर अन्याय केला जात आहे.
शिक्षक व इतर कर्मचार्‍यांचा वेळोवेळी पगारवाढ केली जात आहे. काही कर्मचारी तुपाशी,तर काही कर्मचारी उपाशी अशी अवस्था येथिल कर्मचारी वर्गात झाल्याने सर्व कामगारांनी एकञ येत काम बंद आंदोलनास सुरवात केली आहे.याबाबत कर्मचारी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आम्ही श्री विवेकानंद नर्सिंग होमचे आयुर्वेद महाविद्यालय व चिकित्सालय, राहुरी फॅक्टरी येथील शिक्षकेतर कर्मचारी असून आम्ही दि. 7 ऑगस्ट रोजी प्रशासकीय अधिकार्‍यांना आमच्या मागणी संदर्भात वेळोवेळी तोंडी व लेखी स्वरुपात निवेदन दिलेले होते. पण अधिकार्‍यांनी शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या मागणीवर कसलीही कार्यवाही केली नाही.सन 2000 सालापासुन पगार वाढविण्याची मागणी करीत आहे. गेल्या 23 वर्षात प्रशासनाने एकदाही पगारवाढ केली नाही. याउलट महाविद्यालयाचे शिक्षक व मर्जीतील कर्मचारी यांच्या पगारात 23 वर्षात अनेक वेळा वाढ झाली. परंतू व्यवस्थापकीय मंडळ व प्रशासनाला एकदा हि आमचे पगार वाढविण्याची सुबुद्धी मिळाली नाही. 23 वर्षात पगारवाढीसाठी केवळ आश्‍वासन व्यतिरीक्त काहीच मिळाले नाही.
 यावेळी कामगारांनी काम बंदचे हत्यार उपसले असून, सर्व कर्मचारी महाराष्ट्र राज्य आश्‍वासित प्रगती योजना, कोवीड काळातील थकित पगार, कोवीड सेंटरमध्ये कामगारांचे मानधन, कंत्राटी कामगारांना कायम करणे, पगारवाढ आदी मागण्यांसाठी संस्था आवारात कामबंद आंदोलन सुरू केले आहे. काहींना भरमसाठ पगार तर काहींना एकदम तुटपुंजा पगार देण्यात येत आहे. जे मर्जीतील व जवळचे आहेत त्यांना व्यवस्थापन कायमच झुकते माप देवून काहींना तुपाशी,तर काहींना उपाशी ठेवीत  असल्याचा आरोप करून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी कामगारांनी व्यक्त केला.या आंदोलनात बाबासाहेब लांबे,श्रीराम कोबरणे,उत्तम भागवत,सुदाम भागवत,प्रमोद साळुंखे,अशोक उगले,राजेंद्र येवले,रोहिणी देशमुख,वीणा मंचरे,सुनिता दिघे,समीर शेख,मोहन देठे,अनिल कदम, कैलास कदम,ज्ञानेश्‍वर टिक्कल,सिताराम गाढे,अल्ताफ इनामदार,बाबासाहेब शेटे, बाबासाहेब तांबे,सिद्धु सुर्यवंशी,सचिन वराळे, गोविंद भांड, मनोज गायकवाड, दादा वरखडे,राजु गडाख,अमृत कदम,अरुण तौर,महादेव प्रसाद,विलास काळे,दुर्गा गाढे, प्रतिभा जर्‍हाड,सोनाली मस्के,पुष्पा हारदे आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत.

COMMENTS