Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डी शहरासह तालुक्यात तीव्र पाणी टंचाई

पाथर्डी ः शहरासह तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्‍न एकीकडे बिकट होत चालला असताना दुसरीकडे सर्वच पक्षाचे नेते लोकसभा निवडणुकीत गर्क झाल्याने आपली व्यथा

खून झालेल्या महिलेवर अत्याचार ? व्हिसेरा ठेवला राखून
उसाला तोड मिळत नसल्याने शेतकर्‍याने स्वतःला संपवले
महागाई विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे वाहनांना धक्का मारो आंदोलन

पाथर्डी ः शहरासह तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्‍न एकीकडे बिकट होत चालला असताना दुसरीकडे सर्वच पक्षाचे नेते लोकसभा निवडणुकीत गर्क झाल्याने आपली व्यथा नेमकी कोणाला सांगायची असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.सलग दोन वर्ष पावसाने पाठ फिरवल्याने सध्या तालुक्यातील ग्रामीण भागात आणि शहरातही पाण्याची भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
शहराला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पाण्याचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे पाहवयास मिळत असून याबद्दल पालिका प्रशासनाकडून तांत्रिक कारणामुळे ही अडचण निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे.सध्या शहरातील प्रभागात दहा ते बारा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने आणि बोरवेल आटल्याने नागरिकांना पाणीबाणी ला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांशी निगडित असलेल्या पंचायत समिती व नगर पालिकेत सध्या प्रशासकीय राजवट असून नागरिकांच्या पाण्यासाठी होणार्‍या वेदना ऐकायला अधिकार्‍यांना वेळ नाही.समिती मध्ये हक्काचा सदस्य नाही अन पालिकेत हक्काचा नगरसेवक नसल्याने जमेल तसे आंदोलन करून सध्या नागरिक आपली व्यथा मांडत आहे.तर दिवसेंदिवस तालुक्यातील अनेक गावातून टँकरचे प्रस्ताव प्रशासनकडे दाखल होत असून प्यायला एकीकडे पाणी नसताना दुसरीकडे जनावरांसाठी पाणी कोठून आणायचे या प्रश्‍नाने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. पूर्वी एक पाणी जार पंचवीस रुपयांना तर पाचशे लिटरची टाकी दीडशे रुपयांना भेटायची मात्र आता यासाठी आता जास्त पैसे मोजण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

COMMENTS