Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात सोमवारपासुन थंडीचा पारा वाढणार

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडी पळाली असून, अनेक ठिकाणी पावसाने झोडपून काढल्याचे चित्र आहे. मात्र येत्या सोमवारपासून राज्य

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चांदवड तालुकाध्यक्षपदी रघुनाथ आहेर  
डिजिटल अटकेपासून सावध व्हा : पंतप्रधान मोदी
कांदा निर्यात शूल्काचा फेरविचार व्हावा ः आ. आशुतोष काळे

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडी पळाली असून, अनेक ठिकाणी पावसाने झोडपून काढल्याचे चित्र आहे. मात्र येत्या सोमवारपासून राज्यात पुन्हा एकदा थंडीचा पारा वाढणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. पश्‍चिमी चक्रवातामुळे 16 ते 18 डिसेंबरदरम्यान हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये थंडीची लाट येणार आहे. त्यामुळे सोमवार, 19 डिसेंबरपासून गुजरात आणि महाराष्ट्रातील किमान तापमान 3 ते 4 अंशांनी घसरून थंडीत वाढ होणार आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद, परभणी, बीड, जालना, नांदेड, मुंबई, कोकणसह विदर्भात थंडी अधिक राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला. चक्रीवादळाच्या परिणामामुळे राज्यात अवकाळी पाऊस झाला. बुधवारी रात्रभर औरंगाबादेत मुसळधार पाऊस झाला. राज्यात गुरुवारी सकाळी आकाश निरभ्र होते. मात्र सायंकाळी पुन्हा नाशिक, धुळे, नंदुरबार भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अकोला आणि बुलडाणा परिसरात हलका ते मध्यम पाऊस झाल्याचे हवामान खात्याने कळवले आहे.

COMMENTS