Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत मराठा समाजाने आरक्षणासाठी काढला मोर्चा

मुंबई ः मराठा समाजाचे वादळ गुरूवारी मुंबईमध्ये घोंघावतांना दिसून आले. मराठा बांधवांनी त्यांच्या न्याय हक्कांसाठी गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगला असा

मुखेड शहरात घाणीचे साम्राज्य,पाण्यासाठीही पायपीट, प्रशासनाचे दुर्लक्ष
परिश्रम, संस्कार व सकारात्मकता आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली – डॉ.भारतभूषण क्षीरसागर
पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘या’ इंधनावर चालणार गाड्या; नितीन गडकरींकडून महत्वपूर्ण संकेत LokNews24

मुंबई ः मराठा समाजाचे वादळ गुरूवारी मुंबईमध्ये घोंघावतांना दिसून आले. मराठा बांधवांनी त्यांच्या न्याय हक्कांसाठी गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगला असा मोर्चा काढला आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तात मोर्चाला सुरुवात झाली आहे. मराठा बांधवांचा मोर्चा निघणार हा व्हायरल मेसेज पोलिसांपर्यंत पोहचला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी मरिन ड्राईव्ह परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला. आता हाच व्हायरल मेसेज खरा ठरला असून मराठा आंदोलक मोर्चासाठी गिरगाव चौपाटीवर एकत्र आलेत.
गिरगाव चौपाटीपासून मोर्चाला सुरुवात झाली असून हा मोर्चा मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याच्या दिशेने कूच करत आहे. याच पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरही कडेकोट पोलिस मराठा क्रांती मोर्चातर्फे मुंबईत धडक मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चाला सुरुवात झाली असून मोर्चाने थेट मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याच्या दिशेने कूच केली आहे. मोर्चा गिरगाव चौपाटीहून निघाला असून तो वर्षा बंगल्यावर जाणार आहे. त्यादरम्यानच्या रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. आरक्षण हे मराठा म्हणूनच पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे, कायद्यात टिकणारे पाहिजे या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाकडून हे आंदोलन केले जात असल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे. हा मोर्चा गिरगाव चौपटी शहीद तुकाराम ओंबळे स्मारकापासून सुरू झाला असून थेट मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यापर्यंत जाणार आहे. पण, या आंदोलनामुळे मराठा समाजात दोन मते तर निर्माण झाली नाहीत ना? असा प्रश्‍न सध्या उपस्थित होत आहे. कारण काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अंतरवाली सराटी जालना येथे आमरण उपोषण केले होते. मराठ्यांना कुणबीमधून आरक्षण द्या, यासह इतर मागण्यांसाठी जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. पण आता मराठा क्रांती मोर्चाने मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण द्या, अशा मागणीसाठी आंदोलन सुरु केले असून वर्षा निवासस्थानापर्यंत मोर्चा काढला आहे.

COMMENTS