Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवळाली प्रवरा नगरपालिकेचे बदनामी करणार्‍यांचा निर्णय नागरिकच घेतील

माजी आमदार चंद्रशेखर कदम ः कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन

देवळाली प्रवरा ः देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या कामकाजा बाबत नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्या सोडविण्यासाठी नगरपालिका अधिकारी व कामगारांची बैठक घे

पंचायत समिती पदाधिकारी अडकला हनी ट्रॅपच्या जाळ्यात
भाजप मधल्या ही त्या नेत्यांची इडीने माहिती जाहीर करावी (Video)
अवघी दोन दिवसाची सवलत…मनपाने केले पुन्हा सर्व बंद ; किराणा-भाजी मिळण्यास येणार अडचणी, पोलिसांनी घेतला होता आक्षेप

देवळाली प्रवरा ः देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या कामकाजा बाबत नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्या सोडविण्यासाठी नगरपालिका अधिकारी व कामगारांची बैठक घेतली. या बैठकी नंतर देवळाली प्रवराचा हितशत्रू कामगारांना दमबाजी करत असल्याचे समजले. सोशल मीडियावर असे कितीही व्हिडीओ व्हायरल केले तरी देवळालीच्या विकासाठी मला काही फरक पडत नाही. त्या हितशत्रुचा निर्णय देवळाली प्रवराचे नागरिक योग्य वेळी घेतील असे स्पष्ट मत माजी आमदार चंद्रशेखर पा.कदम यांनी मांडले आहे.

नगरपालिकेत सध्या प्रशासकीय राज असल्याने नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी सध्या पालिकेत पुर्ण वेळ मुख्याधिकारी नसल्याने  अधिकारी व कर्मचार्‍यांची गुरवारी बैठक घेवून नागरिकांच्या समस्या कशा पद्धतीने सोडवता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. अधिकारी व कर्मचार्‍या बरोबर नागरिकांच्या समस्यावर चर्चा करत असताना देवळाली गावाचा हितशत्रू याने चोरुन व्हिडीओ शुटींग करुन सोशल मीडियावर व्हायरल करताना माजी आ.चंद्रशेखर पा.कदम यांना खुर्चीचा मोह सुटेना अशा अशायचे वृत्त प्रसारीत केल्यामुळे माजी आ.कदम समर्थक आक्रमक झाले होते.परंतू माजी.आ.कदम यांनी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला देवून शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

              नागरिकांना जाहिर आवाहन करुन शुक्रवारी सकाळी नगराध्यक्ष दालनात नागरिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राहुरी फॅक्टरी येथील नागरिकांनी पाण्याची समस्या मांडली. तर देवळाली प्रवरा शहरातील समस्या मांडताना पत्रकार रफिक शेख म्हणाले की, देवळाली प्रवरा शेटेवाडी या एकाच भागात डेंग्युचे 31 रुग्ण आढळले आहेत.फवारणी करताना घराच्या समोरील भागात केली जाते. तसे न करता घराच्या पूर्ण परीसरात करावी अशी मागणी केली. इतर समस्या मांडल्या सर्व समस्या तातडीने सोडविण्यास माजी आमदार कदम यांनी सांगितले आहे. डेंग्यू बाबत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. जाकीर शेख यांच्याशी माजी आमदार कदम यांनी नागरिकांसमोर चर्चा केली असता .डेंग्यूचे रुग्ण खाजगी उपचार घेत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याची माहिती नाही.ज्या भागात डेंग्यूचे जादा रुग्ण आहेत.त्या भागाची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राने फवारणीसाठी औषधे उपलब्ध होतात का? याची माहिती घ्यावी असे माजी नगराध्यक्ष कदम यांनी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, गोरक्षनाथ मुसमाडे, मच्छींद्र कदम, सोपान शेटे, अमोल कदम, संतोष चव्हाण, अजित चव्हाण, सोपान भांड, भारत शेटे, वसंत कदम, सुदाम भांड, राजेंद्र ढुस, दिलीप मुसमाडे, भाऊसाहेब वाळूंज, राजेंद्र पंडीत, सचिन सरोदे, बाबासाहेब शेटे, किशोर तोडमल आदीसह नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

दमबाजी करणार्‍यांची गय करणार नाही ः माजी आमदार कदम – नगरपालिका सर्व नागरिकांची आहे. नगर पालिका कर्मचारी व अधिकारी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आहेत.घरपट्टी आकारणीचे दरचार वर्षांनी पुर्नमुल्यांकन केले जाते. नगररचना विभाग पुर्नमुल्यांकन करत असते. पालिका फक्त हरकतीसाठी नोटीस बजवतात. पुर्नमुल्यांकन दर चार वर्षांनी करतात हेच हितशत्रुूला माहित नाही.त्या हितशत्रूचा अभ्यास कमी असेल असे म्हणताच हशा पिकला. परंतू काही हितशत्रू पालिकेत येवून अधिकारी व कर्मचारी यांना दमबाजी करीत असल्याची बाब या बैठकीत समोर आली आहे. जर असा प्रकार होत असेल तर गाठ माझ्याशी आहे. दमबाजी करणार्‍या हितशत्रूची गय केली जाणार नाही.असे माजी आमदार कदम यांनी सांगितले.

COMMENTS