Homeताज्या बातम्यादेश

आफताबनेच केली श्रद्धाची हत्या

दिल्लीच्या साकेत कोर्टात आरोप निश्‍चित

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः देशभरात खळबळ उडवून देणार्‍या श्रद्धा वालकर हत्याकांकड प्रकरणात आरोपी आफताब पूनावालाच्या विरोधात दिल्लीच्या साकेत न्यायालया

पाणीपुरवठा योजनांना तात्काळ प्रशासकीय मान्यता देऊन कामे सुरु करा : राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
कांद्याच्या किमतीत मोठी घट केंद्र सरकारची माहिती
दंगल करणांंऱ्या एकालाही सोडणार नाही – पालकमंत्री यशोमती ठाकूर | LOKNews24

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः देशभरात खळबळ उडवून देणार्‍या श्रद्धा वालकर हत्याकांकड प्रकरणात आरोपी आफताब पूनावालाच्या विरोधात दिल्लीच्या साकेत न्यायालयाने भारतीय दंड संहिता कलम 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा निश्‍चित केला आहे. तसंच कलम 201 अंतर्गत गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचाही आरोप निश्‍चित केला आहे. आफताब पूनावालाने त्याची लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. हे तुकडे त्याने दिल्लीच्या महारौलीच्या जंगलात आणि इतर भागांमध्ये फेकले होते. काही तुकडे त्याने ग्राईंडरमध्ये बारीक केले होते आणि हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याला नोव्हेंबर महिन्यात अटक करण्यात आली. आफताबने हे आरोप स्वीकारण्यास नकार देत न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाची सुनावणी 1 जून रोजी होणार आहे.  न्यायालयाने श्रद्धाचे वडील विकास वालकर यांच्या एका याचिकेला 9 तारखेपर्यंत स्थगिती दिली होती. या याचिकेत विकास वालकर यांनी असे म्हटले होते की माझ्या मुलीच्या मृतदेहाचे अवशेष मला द्या मला त्यावर परंपरेप्रमाणे अंत्यसंस्कार करायचे आहेत. मात्र या याचिकेला स्थगिती देण्यात आली आहे.

COMMENTS