Homeताज्या बातम्यासंपादकीय

गुन्हेगारीचे ‘हब’  !

महाराष्ट्र राज्याची पुरोगामी म्हणून ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून या राज

दुष्काळाच्या झळा आणि पाणीटंचाई
जगणे महागले
वाढता जातीय तणाव चिंताजनक  

महाराष्ट्र राज्याची पुरोगामी म्हणून ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून या राज्याची ओळख आहे. त्याचप्रमाणे पुणे शहराची ओळख शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक वारसा असलेले शहर म्हणून ओळख असलेल्या या शहराला आणि राज्याला अमली पदार्थांचा विळखा घट्ट होतांना दिसून येत आहे. पुण्याची ओळख शिक्षणाचे माहेर घर आणि सांस्कृतिक शहर. पण, ती आता आयटी हब अशीही झाली आहे. त्याचप्रमाणे पुन्हे आता गुन्हेगारीचे हब देखील बनतांना दिसून येत आहे. कोयता गँग, दिवसाढवळ्या गोळीबार, अनेकांचे मुडदे पडतांना दिसून येत आहे. ती कमी म्हणून की काय आता ड्रग्जचा विळखा पुण्याला घेरतांना दिसून येत आहे. अमली पदार्थांची तस्करी देखील त्याचप्रमाणात सुरू आहे. पुण्यातील शिक्षण आणि नोकरीनिमित्त विद्यार्थी, परदेशी नागरिक आणि आयटी कंपन्यांमध्ये कार्यरत असणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या वर्गाकडे बक्कळ पैसा देखील आहे. तसेच, त्यांची अंमली पदार्थ खरेदी करण्याची क्षमता लक्षात घेता त्यांना तस्करांकडून टार्गेट करतात. दरम्यान, पूर्वी गांजा, अफू, चरस या अंमली पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी होती. ती आता बदलली असून, त्याची जागा एमडी, केटामाइन, हेरॉइन, एलएसडी स्टँप या महागड्या अंमली पदार्थांनी घेतली आहे. या पदार्थांचे सेवन करणारा वर्ग उच्चभ्रू आहे.

त्यामुळे मिळेल त्या भावाने ती मिळविले जाते. विक्रेत्यांना ते परवडते. त्यामुळे त्याची विक्री देखील मोठ्या प्रमाणात होते. आयटी पार्क, महाविद्यालये तसेच उच्चभ्रु परिसर या तस्करांकडून टार्गेट केला जातो. त्यासोबतच आयोजित अनेक पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थांचा सर्रासपणे वापर केला जात असल्याचे काही वर्षांपुर्वी झालेल्या कारवायांमध्ये दिसून आले होते. दररोज पकडण्यात येणारे कोट्यावधींचे ड्रग्ज यामुळे पालकांना आपल्या पाल्याची भीती वाटायला लागली आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये शिक्षणासाठी लाखो विद्यार्थी येतात. मात्र या विद्यार्थ्यांना ड्रग्जचे व्यसन लागतांना दिसून येत आहे. त्यामुळे ड्रग्जची मागणी सातत्याने वाढतांना दिसून येत आहे. त्यामुळे ड्रग्जचे रॅकेट मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. पुण्यासारख्या सांस्कृतिक वारसा लाभलेल्या शहरात लाखो विद्यार्थी भविष्यातील स्वप्ने घेऊन येतात. मात्र मृगजळाच्या मागे धावतांना ते आपले आयुष्य हरवून जातात, आणि एका वेगळ्याच दुनियेत जगत असतात. जेव्हा जाग येते, तेव्हा वय निघून गेलेले असते, आणि भविष्यात अंधकाराशिवाय कोणतीही वाट गवसत नाही. मुळातच प्रश्‍न हा उपस्थित होतो, या शहरातच नव्हे तर राज्यभरात ड्रग्जचे रॅकेट चालवणारे ते कोण, याबाबतची पोलिसांना माहिती नाही का, पोलिस त्यांच्या मुसक्या का आवळू शकत नाही. याच ड्रग्जवाल्यांचे राजकीय संबंध अनेकवेळेस उघडकीस आले आहे.

ललित पाटील प्रकरणात तर अनेक ड्रग्जचे कारखाने सापडले आहे. पालघर, मुंबई, पुणे यासारख्या शहरात राजरोजपणे ड्रग्जची विक्री सुरू आहे. ललित पाटील प्रकरण शांत होत नाही तोच पुणे पोलिसांनी 100 किलो मेफेड्रोन जप्त केले. यासोबतच पोलिसांनी दौंड परिसरातील करकुंभ एमआयडीसी परिसरात छापा मारून कारखान्यातून 550 किलो मेफेड्रोन नावाचे ड्रग्ज ताब्यात घेतले. या 550 किलो मेफेड्रोन ड्रग्जची खुल्या बाजारात सुमारे अकराशे कोटी रूपये किंमत आहे. त्यामुळे या रॅकेटचा आवाका, त्यातून मिळणारा पैसा आणि त्यातून त्यांना मिळणारे राजकीय अभय या बाबी पुन्हा एकदा अधोरेखित होतांना दिसून येत आहे. कोणताही गुन्हेगार राजकीय आणि पोलिसांचे आशीर्वाद असल्याशिवाय इतक्या मोठ्या बाबी करत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची गंभीरपणे चौकशी करण्याची खरी गरज आहे. महाराष्ट्र हा अमली पदार्थांच्या व्यसनाने पोखरतोय, अनेक पिढ्या उद्धवस्त करणारा हा ड्रग्ज महाराष्ट्रातून हद्दपार करण्याची खरी गरज आहे. मात्र तशी मानसिकता आणि इच्छाशक्ती पोलिसांची असायला हवी. 

COMMENTS