Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महानगर गॅस लिमिटेडकडून सीएनजीच्या दरात कपात

मुंबई प्रतिनिधी - मुंबईतील वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. महानगर गॅस लिमिटेडने मुंबईत सीएनजीच्या दरात कपात केली आहे. मंगळवारी मध्यरात्र

ठाण्यात कोरोनाची चिंता करण्याची गरज नाही.. 
वीज पडून पती-पत्नी आणि दोन चिमुकल्यांचा मृत्यू
घरातील कपाटातून मावस बहिणीनेच लंपास केले दागिने 

मुंबई प्रतिनिधी – मुंबईतील वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. महानगर गॅस लिमिटेडने मुंबईत सीएनजीच्या दरात कपात केली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून सीएनजीचे दर कमी करण्यात आले आहेत. महानगर गॅस लिमिटेडनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. वाहनांमधील नैसर्गिक वायूचे प्रमाण वाढावे सीएनजीचे दर कमी करण्यात आल्याचा कंपनीनं सांगितलं आहे. महानगर गॅस लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २.५० रुपयांची कपात करण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता एक किलो सीएनजीसाठी केवळ ७३.४० रुपयात मिळणार आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर सीएनजीवर चालणारी वाहने आहेत. दर कपातीमुळे या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, पीएनजीच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याआधी ऑक्टोबर महिन्यात महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी-पीएनजीच्या दरात कपात केली होती. त्यावेळी सीएनजीचे दर ३ रुपये तर पीएनजीचे दर २ रुपयांनी कमी करण्यात आले होते. दरम्यान, उत्पादन खर्चात कपात झाल्यामुळे येत्या काही दिवसांत देशाच्या इतर भागात सीएनजीच्या दरात कपात होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका यामुळे केंद्र सरकार इंधनाच्या किंमतीत कपात करण्याचा निर्णय घेऊ शकतं.

COMMENTS