Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तांदळी दुमाला ग्रामपंचायतीचा विकास कामांचा सपाटा सुरूच

श्रीगोंदा :  तांदळी दुमाला ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच तसेच माजी उपसरपंच सर्व सदस्य आणि ग्रामसेवक यांनी सतत पाठपुरावा करून तांदळी दुम

पोटच्या मुलांचा खून करणार्‍या कर्जतमधील बापाला जन्मठेपेची शिक्षा
पुजार्‍याच्या खून प्रकरणी शंकर शिकारेला जन्मठेप
केडगावात एकाच दिवशी दोनजण झाले बेपत्ता

श्रीगोंदा :  तांदळी दुमाला ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच तसेच माजी उपसरपंच सर्व सदस्य आणि ग्रामसेवक यांनी सतत पाठपुरावा करून तांदळी दुमाला गावातील गंगाधरे वस्ती हा रोड डांबरीकरण करण्यासाठी 1 कोटी 63 लक्ष रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त केला. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार पुत्र विक्रम पाचपुते यांचे हस्ते करण्यात आले.
तांदळी दुमाला ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे,उपसरपंच तुषार धावडे तसेच माजी उपसरपंच राजेंद्र भोस सर्व सदस्य व ग्रामसेवक यांनी गावाच्या विकासासाठी हाती घेतलेल्या विकास कामांचे प्रत्येक वार्डाच्या कानाकोपर्‍यापर्यंत गावकर्‍यांच्या मूलभूत सोयी सुविधांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन आमदार बबनराव पाचपुते यांच्याकडे विविध विकास कामांचा पाठपुरवठा करून आपल्या गावातील गंगाधरे वस्ती हा रोड डांबरीकरण करण्यासाठी 1 कोटी 63 लक्ष रुपये निधी मंजूर करून घेतला. या कामाचे भूमिपूजन युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांचे हस्ते करण्यात आले. गावाच्या विकास कामासाठी विक्रमसिंह पाचपुते यांचे कडे अजून काही भरीव निधी आणण्यासाठी सरपंच यांच्या सह सर्व टीमचा पाठपुरावा चालू आहे या विकास कामांना ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी तसेच गावकर्यांनी मोलाचे सहकार्य केले. रस्त्याच्या उदघाटन कार्यक्रमासाठी सरपंच संजय निगडे,उपसरपंच तुषार धावडे,माजी उपसरपंच राजेंद्र भोस ,माजी उपसरपंच महेश भोस ,ग्रामपंचायत सदस्य संतोष हराळ ,नर्सिंग भोस, भरत शेळके, तसेच नानासाहेब हराळ,यात्रा कमिटी अध्यक्ष संदीप रोडे, माजी सरपंच हावसरव बोरुडे ,माजी सरपंच देविदास भोस,पोलीस पाटील अनिल शेळके ,लक्ष्मण भोस, ह.भ. प.आबासाहेब नवले,दत्ता अबा भोस, अनिल गंगाधरे, भाऊसाहेब धालवडे, वैभव हराळ विश्‍वप्रभात प्रतिनिधी, झुंबर खुरांगे तसेच गावातील सर्व आजी माझी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार बबनराव पाचपुते यांच्याकडून आणखी विकास कामांसाठी निधी प्राप्त करून गावासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी या पुढेही पाठपुरावा करणार आहे. गावाची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू असून विकास कामांचा झपाटा असाच सुरु ठेवणार. सरपंच संजय निगडे, तांदळी दुमाला.

COMMENTS