Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोहारवाडी मोरगव्हाण रस्त्यावर आढळला मृतदेह

संशयित आरोपीला पाच दिवसाची पोलिस कोठडी

सोनई/प्रतिनिधी ः नेवासा तालुक्यातील लोहारवाडी-मोरगव्हाण रस्त्यावर ऊसाच्या शेतात मृतदेह मिळवून आल्याने व मयत व्यक्तीच्या भावाने सोनई पोलिस ठाण्यात

‘त्या’ रस्त्याचा निधी दुसरीकडे वळवू नका ः राष्ट्रवादीची मागणी
BREAKING: कोरोना होऊन गेला तरी लोकांना कळत नाही नांदेडच्या छातिरोगतज्ज्ञांचा खुलासा | LokNews24
गर्दीचा फायदा घेऊन लहान मुलीच्या दागिन्याची चोरी 

सोनई/प्रतिनिधी ः नेवासा तालुक्यातील लोहारवाडी-मोरगव्हाण रस्त्यावर ऊसाच्या शेतात मृतदेह मिळवून आल्याने व मयत व्यक्तीच्या भावाने सोनई पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित योगेश भालशकर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संशयितास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
याबाबद पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 15 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेदरम्यान हरिचद्र लोंढे हा घरातील माणसांना म्हणाला की, मी गावांतून चक्कर मारुन येतो, असे सांगुन गेला तो परत आलाच नाही. म्हणून घरच्यांनी शोध घेतला पण तो मिळवून आला नाही. शोध घेत असतांना 16 एप्रिल रोजी दुपारी 5 ः15 सुमारास तो जखमी  अवस्थेत लोहारवाडी ते मोर गव्हाण जाणार्‍या शिव रस्त्यालगत असलेल्या ऊसाच्या शेतात पडलेला आहे असे समजल्याने तातडीने त्यास नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. त्यानंतर येथील डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांनी मयत घोषित केले. फिर्यादीस घोडेगाव येथील लोकांकडून अशी माहिती मिळाली कि 15 एप्रिल रोजी संध्याकाळी तुझा भाऊ व त्याचा मित्र योगेश भालशकर हे दोघे एकत्र होते व एकाच गाडीवर फिरत होते असे समजल्याने मयताचा भाऊ हा योगेश भालशकर यांच्याकडे चौकशी करण्याकरिता गेलो असता तो घरी मिळवून आला नाही. त्याचा लोंढे कुटुंबातील सदस्य यानी बर्‍हाणपूर घोडेगाव शिवारात शोध घेतला असता, तो मिळवून आला नाही म्हणून योगेश भालशकर याने हरिश्‍चंद्र पोपट लोंढे याला कोणत्यातरी गाडीवरुन मोर गव्हाण शिवारात नेवून कोणत्यातरी कारणास्तव कोणत्यातरी हत्याराने जबर मारहाण केल्याने त्या मारहाणीत माझ्या भावाचा मृत्यू झाला आहे असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरुन सोनई पोलिस ठाण्यात 302 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास सोनई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी हे करीत आहेत.

COMMENTS