Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणतांबा येथे मोफत शिबिरात 880 रुग्णांची नेत्र तपासणी

गणेशनगर प्रतिनिधी - पुणतांबा शिवसैनिकांचे आरोग्य विषयक कार्य तरुणांसाठी स्फूर्तीदायक गेल्या सहा महिन्यापासून पुणतांबा येथे महाआरोग्य अभियानांतर्

ज्ञानयज्ञ तेवत ठेवा ः झावरे… जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचा दसरा महोत्सव
संगमनेरात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा
जायकवाडीला पाणी सोडल्यास उच्च न्यायालयाचा अवमान होणार 

गणेशनगर प्रतिनिधी – पुणतांबा शिवसैनिकांचे आरोग्य विषयक कार्य तरुणांसाठी स्फूर्तीदायक गेल्या सहा महिन्यापासून पुणतांबा येथे महाआरोग्य अभियानांतर्गत सुरू असलेले तुलसी आय हॉस्पिटल व चांगदेव नगर युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी व नेत्र शस्त्रक्रिया शिबिराकरिता  तेराव्या टप्प्या अंतर्गत एकूण 880 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली.
एकूण या माध्यमातून 135 रुग्णांवर मोफत मोतीबिंदू व काचबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महाआरोग्य अभियान राहता तालुका समन्वयक आबासाहेब नळे यांनी सांगितले की, शिवसैनिकांच्या व चांगदेव नगर युवा मंच पदाधिकार्‍यांच्या परिश्रमानंतर आम्ही या शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांची सेवा करण्याचा मोठा टप्पा गाठलेला आहे. भविष्यात सुद्धा पुणतांबा पंचक्रोशीमध्ये रुग्नेसेवेचा महायज्ञ याच पद्धतीने चालू ठेवणार आहे. यावेळी शिवसेना नेते अनिलराव नळे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. शिवसेना उप तालुकाप्रमुख भास्कर मोटकर शिवसेना शहरप्रमुख अशोकराव गायकवाड शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष अधिकारी अ‍ॅड. राहुल नवले अ‍ॅड. विकास जोंधळे, चांगदेव नगर युवा मंचचे पंकज नळे, दत्तात्रय धनवटे, दादा आगरी, संजय धनवटे, शौकत शहा, तोफिक भाई तांबोळी, शिवा प्रधान विकास जोगदंड, संतोष जोगदंड, संभाजी नळे, दत्ता परदेशी, सोनू डोईजड यांचे मोठे योगदान मिळत आहे.

COMMENTS