गाझीपूर प्रतिनिधी / गाझीपूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील रेवतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अठठा येथे पुरामुळे २५ जणांना घेऊन
गाझीपूर प्रतिनिधी / गाझीपूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील रेवतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अठठा येथे पुरामुळे २५ जणांना घेऊन जाणारी बोट उलटली. या अपघातात काही जणांनी पोहताना जीव वाचवला तर काहींना तिथे उपस्थित खलाशांनी पाण्यात उडी मारून वाचवले. चार जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर 5 मुले अजूनही बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. तर शिवशंकर गोड आणि नगीना पासवान यांचा गाझीपूर बोट अपघातात मृत्यू झाला आहे.

COMMENTS