कामिका एकादशीनिमित्त पंढरपुरात भाविकांची गर्दी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कामिका एकादशीनिमित्त पंढरपुरात भाविकांची गर्दी

पंढरपूर : कामिका एकादशी निमित्त हजारो भाविकांची पंढरपूरात मोठया प्रमाणावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. कोरोना निर्बंधाच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूरात

यवतमाळ जिल्ह्यातील 104 वर्षीय आजोबांची नायगावला भेट
म्युकरमायकोसिसची औषधे कोठूनही मागवा l पहा LokNews24
राज्यात अतिवृष्टीचे 84 बळी

पंढरपूर : कामिका एकादशी निमित्त हजारो भाविकांची पंढरपूरात मोठया प्रमाणावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. कोरोना निर्बंधाच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूरातील विठ्ठलाचे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. तरी देखील पंढरपूरात भाविक चंद्रभागेचे स्नान करून, संत नामदेव पायरी आणि कळसाचे दर्शन घेऊन परतत आहेत. आषाढीला एकादशीला सर्वसामान्य भाविकांना पंढरीत येता आले नाही. त्यामुळे बुधवारी कामिका एकादशीला एकाच दिवसात 50 हजार भाविकांनी उपस्थिती लावल्याचे चित्र दिसून आले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाच्यावतीने मंदिर परिसरात, तसेच प्रदक्षिणा मार्गावर पंढरपुरात येणार्‍या सर्व भाविकांची कोरोना टेस्ट केली जात आहे. पोलिस विभागाच्या वतीने भाविकांना कोरोना नियमांचे पालन करण्याच्या वेळोवेळी सूचना सुद्धा दिल्या जात आहेत. असे असताना मात्र कामिका एकादशीनिमित्ताने पंढरपुरात हजारो भाविकांची गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले.

COMMENTS