Homeताज्या बातम्यासंपादकीय

एका नव्या युद्धाची नांदी

आजमितीस युद्ध कोणत्याही देशाला परवडणारे नाही, त्यामुळे प्रत्येक देशाने शांततापूर्ण सहअस्तित्वाला प्राधान्य देण्याची गरज असतांना, महत्वाकांक्षी स्

‘मविआ’ ची वज्रमूठ सेैल
विद्युत वाहनांना मंत्र्यांचीच नकारघंटा
राजकारणाचे बाजारीकरण

आजमितीस युद्ध कोणत्याही देशाला परवडणारे नाही, त्यामुळे प्रत्येक देशाने शांततापूर्ण सहअस्तित्वाला प्राधान्य देण्याची गरज असतांना, महत्वाकांक्षी स्वभावाला मुरड न घालता अनेक देश, युद्धाला पसंती देतांना दिसून येत आहे. परिणामी यातून हल्ला करणार्‍या आणि तो झेलणार्‍या दोन्ही देशांची प्रचंड हानी होतांना दिसून येत आहे. रशिया-युक्रेन युद्धाचे ढग अजूनही शांत झालेले नसतांना, पुन्हा एक नवे युद्ध जगावर घोंघावतांना दिसून येत आहे. गाझापट्टीवर अर्थात इस्त्रायलवर पॅलेस्ट्राईनने हल्लाबोल करत, अनेक क्षेपणास्त्र डागल्यामुळे 300 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे इस्त्रायलची प्रचंड हानी होतांना दिसून येत आहे. त्याचबरोबर इस्त्रायलने देखील युद्धाची घोषणा केली असून, पॅलेस्टाईनवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे गाझापट्टी पुन्हा एकदा युद्धाची भूमी बनतांना दिसून येत आहे. या संपूर्ण युद्धाची पार्श्‍वभूमी बघायची झाल्यास इस्त्राईल देशाचा इतिहास तपासून घेण्याची गरज आहे. इस्त्राईल हे ज्यू वंशीयांचे राष्ट्र अस्तित्वात येऊ नये यासाठी इस्लामिक देशांनी सुरुवातीपासूनच विरोध केला होता. त्यातूनच इस्त्राईल-अरब यांच्यात 1967 मध्ये युद्ध झाले. त्यात इस्त्राईलने युद्ध जिंकले. हा भूभाग ज्यू लोकांच्या अधिपत्याखाली आला. त्यानाराजीने हमास ही संघटना 1980 मध्ये स्थापन झाली. वेस्ट बँग आणि गाझा पट्टीतून ज्यू लोकांना हकलण्यासाठी हमास संघटना आकाराला आली. या संघटनेने दहशतवादी कारवाया सुरु केल्या. ज्यू लोकांना टार्गेट करायला सुरुवात झाली. दोन्ही भागात लष्करी प्रशिक्षणाला सुरुवात झाली. भूभागासोबत या लढाईला धार्मिक आयाम आहेत. त्यामुळे सातत्याने हमास ही दहशतवादी संघटना इस्त्राईलला टार्गेट करतांना दिसून येत आहे. या युद्धात इस्त्रायलच्या बाजूने अमेरिकेसह युरोप देश उभे राहिले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्त्राईलला प्रचंड पाठिंबा मिळतांना दिसून येत आहे. मात्र युद्ध आजतमितीस कुणालाही परवडणारे नाही. खरंतर दुसर्‍या महायुद्धानंतर आणि 1991 मध्ये सोव्हियत रशियाचे विघटन झाल्यानंतर अनेक देशांनी धडा घेतला होता. युद्ध नकोच असा अनेक देशांचा पवित्रा कायम राहिला आहे. कारण युद्धामुळे सैन्याची हानी, देश विस्थापित होणे, प्रचंड आर्थिक ताण, नागरिकांचे मृत्यू, यामुळे सर्वसामान्य माणसांबरोबर देशाला प्रचंड झळ सोसावी लागते. युक्रेन युद्धामुळे युके्रनची जितकी हानी झाली, त्यापेक्षाही जास्त झळ रशियाला सोसावी लागत आहे. कारण रशिया अमेरिकेला टक्कर देऊ शकणारा एकमेव देश होता. मात्र युरोप खंडामध्ये रशियाची कोंडी होतांना दिसून येत आहे. त्यामुळेच रशियाने युद्धाचे अस्त्र उपसले. मात्र यामुळे रशियाचा प्रश्‍न सुटला नाही, तर तो अधिक किचकट होतांना दिसून येत आहे. त्यामुळे कोणताही प्रश्‍न शांततेने सुटत असतांना, युद्धाचा मार्ग अवलंबण्याची गरज नाही. असे असतांना, गाझापट्टीवर पॅलेस्ट्राईनने केलेला हल्ला यामुळे पुन्हा एकदा युद्धाचे ढग घोंघावतांना दिसून येत आहे. पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने इस्त्राईलवर हल्लाबोल चढवला. त्यात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि संपत्तीचे नुकसान झाले आहे. गेल्या कित्येक दशकांपासून हा भाग अशांत आहे. या भागाला कित्येक वर्षांचा अशातंतेचा शाप आहे. या हल्ल्याने चवताळलेल्या इस्त्राईलने हमाससह पॅलेस्टाईनवर पलटवार केला आहे. तर इस्लामिक देशांनी पॅलेस्टाईनचे कौतुक केले आहे. इराण या देशाचा सर्वोच्च नेता अली खोमेनेई याच्या सल्लागाराने हमासच्या दहशतवाद्यांचे कौतुक केले. पॅलेस्टाईन आणि जेरुसलेम हे जोपर्यंत स्वतंत्र होत नाही, तोपर्यंत ते पॅलेस्टाईन आणि हमासच्या पाठीशी असतील, असा पाठिंबा इराणने दिला. सौदी अरबने हा हिंसाचार तात्काळ थांबविण्याचे आवाहन केले. इजिप्तने गंभीर परिणामांचा इशारा देत, ही हिंसा थांबविण्याचे आवाहन केले. तर दुसरीकडे इस्त्रायलला अमेरिका आणि युरोपने पाठिंबा दिल्यामुळे संपूर्ण जग दोन भागात विभागतांना दिसून येत आहे. परिणामी पुन्हा एकदा नव्या युद्धाचे संकट दिसून येत आहे.

COMMENTS