Homeताज्या बातम्याअहमदनगर

नेत्यावरील निष्ठेची अनवाणी वाट !विवेक  कोल्हेंच्या आमदारकीसाठी कार्यकर्ता सहा वर्ष अनवाणी

कोपरगाव : राजकारणात नेत्यांप्रती निष्ठा व्यक्त करण्याच्या विविध घटना घडत असतात. मात्र, कोपरगाव तालुक्यातील एका तरुण कार्यकर्त्याने घेतलेला संकल्प

कोपरगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीची तपासणी
काका कोयटेंच्या कार्यामुळे सहकार चळवळीला बळ : खा. धनंजय महाडिक
रयत सेवक बँकेची उल्लेखनीय कामगिरी 

कोपरगाव : राजकारणात नेत्यांप्रती निष्ठा व्यक्त करण्याच्या विविध घटना घडत असतात. मात्र, कोपरगाव तालुक्यातील एका तरुण कार्यकर्त्याने घेतलेला संकल्प सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कोल्हे परिवारातील व्यक्ती पुन्हा आमदार होईपर्यंत पादत्राणे न घालण्याचा निर्धार करून तब्बल सहा वर्षे अनवाणी राहिलेल्या वासुदेव संतोष शिंदे या युवकाची तालुक्यात चर्चा होत आहे.कोपरगाव मतदारसंघात अनेक वर्षे माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे वर्चस्व राहिले. त्यानंतरच्या काळात राजकीय समीकरणांमध्ये बदल होत गेले. २०१४ मध्ये स्नेहलता कोल्हे या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या; मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा अल्प मतांनी पराभव झाला. हा पराभव कोल्हे समर्थकांच्या जिव्हारी लागल्याची भावना त्या वेळी व्यक्त करण्यात आली होती.याच पार्श्वभूमीवर वासुदेव शिंदे यांनी २०१९ च्या निवडणूक निकालानंतर शिर्डी येथे साईबाबांच्या चरणी संकल्प केला. “कोल्हे परिवारातील व्यक्ती आमदार होत नाही, तोपर्यंत पादत्राणे घालणार नाही,” अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. त्यानंतर उन्हाळा, पावसाळा आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत त्यांनी हा शब्द कायम ठेवला.सध्या २७ वर्षांचे असलेल्या वासुदेव शिंदे यांनी वयाच्या २१ व्या वर्षी घेतलेला हा संकल्प सहा वर्षे जपल्याने अनेकांकडून त्यांच्या निष्ठेचे कौतुक व्यक्त होत आहे.“पाय अनवाणी होते; मात्र निष्ठा ठाम होती,” अशा शब्दांत अनेक कार्यकर्ते वासुदेव शिंदे यांच्या भूमिकेचा उल्लेख करत आहेत. राजकारणात स्वार्थाचे आरोप होत असताना एका युवकाने जपलेली निष्ठा सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

COMMENTS