रांगोळीतून येऊ लागला सुगंध…पाहणारे झाले मंत्रमुग्ध

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रांगोळीतून येऊ लागला सुगंध…पाहणारे झाले मंत्रमुग्ध

नगरच्या डॉ. बागुल यांचा रांगोळीचा रोमा रंगनाथ पॅटर्न चर्चेत

अहमदनगर/प्रतिनिधी : न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या पक्षकारांपैकी बहुतांशजण तसे मानसिक तणावातच होते. लोकअदालतीत आपल्या प्रकरणाचे काय होते, याची चिंता

दैनिक लोकमंथन l बाळ बोठेच्या जीवाला धोका; नाशिकला ठेवण्याची वकिलाची मागणी
पालखी सोहळ्यातून राजमुद्रा प्रतिष्ठाणने धार्मिक परंपरा जपली
कलाकार प्रमोद पंडित यांचा नरहरी सेनेच्या वतीने सत्कार

अहमदनगर/प्रतिनिधी : न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या पक्षकारांपैकी बहुतांशजण तसे मानसिक तणावातच होते. लोकअदालतीत आपल्या प्रकरणाचे काय होते, याची चिंता त्यांना होती. मात्र, न्यायालयाच्या आवारात आपल्या वकिलासह प्रवेश केल्यावर दरवाजासमोर काढलेली सुरेख रांगोळी त्यांची नजर वेधून घेणारी ठरली. ती पाहत पाहत तिच्याजवळून जाताना चक्क सुगंध येऊ लागल्याने त्यांचे मन उल्हसीत झाले व कोणी काढली ही रांगोळी, अशी चर्चा त्यांच्यात आपसात रंगली. नगरला नुकत्याच झालेल्या लोकअदालतमध्ये नगरचे हरहुन्नरी कलावंत डॉ. अमोल बागुल यांनी रेखाटलेला सुगंधी रांगोळीचा रोमा रंगनाथ पॅटर्न चर्चेचा झाला. दरम्यान, रोमा रंगनाथ नामक सुगंधी रांगोळी रेखाटन या कलाप्रकारासाठी कॉपीराइट, पेटंट, ट्रेडमार्क,आय.एस.ओ.आदी आंतरराष्ट्रीय मानांकने व नामांकनांसाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ. बागुल यांनी सांगितले.
अहमदनगर जिल्हा न्यायालय येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय लोकअदालत उपक्रमात उद्घाटनाप्रसंगी येथील उपक्रमशील शिक्षक डॉ. बागुल यांनी स्वतःच्या नावीन्यपूर्ण संशोधनपर संकल्पनेतून प्रथमच सुमारे 30 प्रकारच्या विविध सुगंधांतून तयार केलेल्या रंगांच्या रांगोळीचा रोमा रंगनाथ पॅटर्न रेखाटला. त्यामुळे संपूर्ण दिवसभर जिल्हा न्यायालय परिसर सप्तरंगी रंगांनी व सुगंधाच्या घमघमाटाने बहरून गेला. पक्षकार, वकील तसेच लोकअदालतसाठी आलेले पक्षकार या रांगोळीचा फोटो व तिच्यासमवेर सेल्फीसाठी पुढाकार घेत होते.
लोकन्यायालयासाठी आलेल्या न्यायाधीशांसह अन्य मान्यवरांनी या सुगंधी रांगोळी उपक्रमाचे कौतुक केले. सुमधुर संगीत व रांगोळीच्या बहारदार प्रदर्शनातून राष्ट्रीय लोकअदालत उपक्रमात निश्‍चितच सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मनपा आयुक्त शंकर गोरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे, सरकारी वकील अ‍ॅड. एस.के.पाटील, सेन्ट्रल वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. किशोर देशपांडे, अहमदनगर बार असोसिएशन अध्यक्ष अ‍ॅड. अनिल सरोदे आदी यावेळी उपस्थित होते.

रेखाटनाला लागले सात तास
रात्री 12 ते सकाळी 7 अशा 7 तासांमध्ये जिल्हा न्यायालयाच्या वास्तूंचा विविध परिसर डॉ. बागुल यांनी रांगोळीच्या सुगंधी रंगांनी सजवला. 15 बाय 15 फुटांची राष्ट्रीय लोकअदालतीची मुख्य थीम बेस्ड स्वागतम रांगोळी, ध्वजस्तंभासमोरील रांगोळी महिरप, मुख्य न्यायाधीश कक्षासमोरील प्रतीक्षा कक्ष, न्याय सेवा सदन इमारतीचे दोन मजले आदी ठिकाणी लोकअदालत प्रतीकांची सुगंधी रंगांची रेखाटने त्यांनी रेखाटली.अ‍ॅड अनुराधा येवले व विकास कर्डिले यांचे सहकार्य यासाठी त्यांना मिळाले.

तब्बल 30 सुगंधी द्रव्ये
डॉ.बागूल यांच्या रोमा रंगनाथ पॅटर्नमधील रोमा म्हणजे निसर्गोपचारातील रोमा चिकित्सा म्हणजेच गंधशास्त्र होय. विविध प्रकारचे वास सुवास व सुगंध आपल्याला प्रफुल्लित व प्रोत्साहित करतात. याकरिता सौंदर्यप्रसाधनांमध्ये विविध सुगंध, अत्तर व फाया यांचा वापर केला जातो. भगवान श्रीकृष्ण व विष्णू हे भारतीय संस्कृतीत रंगांचे जनक मानले जातात म्हणून रंगनाथ हे नाव देण्यात आले आहे. रोमा रंगनाथ पॅटर्नमधील सुगंधी रंगांमध्ये अष्टगंध, बुक्का,अबीर, गुलाल, दावण, केशरी टीका, गुलाब, मोगरा, चंदन, केवडा, जाईजुई, अ‍ॅक्स, इम्पल, जीलेट, आर.जी.एक्स, टॅग्ज,रेक्सोना, सिंथॉल, ब्लॅक हॉर्स, ब्रूट, मॅग्नेट, ब्लॅक हॉर्स, हिल्टन, गस्सी, डनहिल, कॅरलोन हेरेरा, डोलायस अ‍ॅण्ड गॅबेना, दरबारी, मारुबिहग, मुलतानी, सारंग, बिलावल, ललत, कार्टिन, जॉर्जिओ, अरमानी, दालचीनी, लॅव्हेंडर, रोज, जास्मीन, केवडा, चमेली, बकुळ, हिना, चाफा, निशिगंध, पारिजातक, वाळा, कर्पूर काचरी, जटामांसी, वाळा, सुगंध कोकिळा, नागरमोथा, गुलाब जल, केवडा जल यासह सुमारे 30 प्रकारची सुगंधी रसायने, स्प्रे, विविध इसेन्स, अत्तर, सेंट, फुलांचे अर्क, सुगंधी माती व सुगंधी मूलद्रव्यांचा वापर डॉ. बागुल यांनी आदल्या दिवशी रंगांमध्ये मिश्रणासाठी केला. उघड्यावर या रांगोळीचा सुगंध 2 ते 3 तास तर बंदिस्त सभागृहात 7 ते 8 तास टिकतो.

COMMENTS