टॉप हंड्रेड थकबाकीदारांमध्ये…नगर टॉपवर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टॉप हंड्रेड थकबाकीदारांमध्ये…नगर टॉपवर

साखर पट्ट्यातील कृषी पंप थकबाकीदार अजेंड्यावर

अहमदनगर/प्रतिनिधी : महावितरणने राज्यभरातील कृषी वीज बिल थकबाकीदार शेतकर्‍यांची 100 नावे अजेंड्यावर घेतली असून, त्यात नगर जिल्ह्यातील तब्बल 32जण आहेत.

विरोधक खोटे आरोप करत असून आम्ही कुठल्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार;- भाजपाचे विरोधकांना आवाहन …
कुटुंबीयांना वाळीत टाकत केला तीन लाखांचा दंड
दैनिक लोकमंथन l नक्षलवादी हल्ल्यात 22 जवानांना हौतात्म्य

अहमदनगर/प्रतिनिधी : महावितरणने राज्यभरातील कृषी वीज बिल थकबाकीदार शेतकर्‍यांची 100 नावे अजेंड्यावर घेतली असून, त्यात नगर जिल्ह्यातील तब्बल 32जण आहेत. राज्यातील 100 सर्वाधिक कृषी पंप थकबाकीदारांकडे 9 कोटी 28 लाखाचे वीज बिल थकित आहे. या टॉप हंड्रेड थकबाकीदारांमध्ये नगर जिल्हा टॉपवर असण्याची नामुष्की असून, उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंच्या जिल्ह्यातील ही स्थिती जिल्ह्याच्या लौकिकास बाधा आणणारी असल्याने या थकबाकीदारांकडील वसुलीला आता महावितरणने प्राधान्य दिले आहे.
राज्यातील 36 पैकी 12 जिल्ह्यात सर्वाधिक कृषी वीज बिल थकबाकी असलेल्या 100 व्यक्ती वा संस्था असून त्यांच्याकडे एकूण 9 कोटी 28 लाख 90 हजार 600 रुपये इतकी थकबाकी आहे. 100 पैकी सर्वाधिक 32 थकबाकीदार हे अहमदनगर जिल्ह्यातील, त्यानंतर 21 थकबाकीदार हे पुणे जिल्ह्यातील तर 16 थकबाकीदार हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. रोख पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या साखरेच्या पट्ट्यातील 6 जिल्ह्यात 100 पैकी सर्वाधिक 81 थकबाकीदार आहेत. राहिलेल्या 19 थकबाकीदारांपैकी मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात 2, बीड जिल्ह्यात एक, नांदेड जिल्ह्यात 10 असे एकूण 13 थकबाकीदार आहेत. विदर्भात नागपूर व अमरावती जिल्ह्यात प्रत्येकी एक असे केवळ दोन थकबाकीदार या यादीत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात 4 थकबाकीदार आहेत.
महाराष्ट्रात कृषी ग्राहक वीजपुरवठादारांची थकबाकी ही 42 हजार कोटी रुपयांवर पोहचली असून त्यात सर्वाधिक थकबाकी असलेल्या 100 व्यक्ती वा संस्थांकडे 9.28 कोटींहून अधिक रक्कम थकित आहे. राज्यातील सर्वाधिक कृषी पंप थकबाकी ही पुणे जिल्ह्यातील सायगाव येथील शेतकरी सुभकांत पंढरीनाथ काळे यांच्याकडे असून त्या खालोखाल पुणे जिल्ह्यातीलच सी.श्रीनाथ पी.पी. मंडळी यांच्याकडे आणि तिसर्‍या क्रमांकावर औरंगाबाद जिल्ह्यातील देवराव शिर यांच्याकडे थकबाकी आहे. कृषी पंप थकबाकीदारांकडे असलेल्या थकबाकीचा अभ्यास राज्याच्या ऊर्जा विभागाने आणि महावितरणने सुरू केला आहे. या अभ्यासात महावितरणची राज्यातील सर्वाधिक थकबाकी असलेल्या 100 शेतकर्‍यांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीचा अभ्यास केल्यानंतर 10 लाखांहून अधिक थकबाकी असलेले 20 शेतकरी वा संस्था राज्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या 20 थकबाकीदारांकडे एकूण 2 कोटी 63 लाख 82 हजार 410 रुपये थकित आहेत. ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुढाकार घेत कृषीपंप धोरण आखले असून सप्टेंबर 2020 पर्यंतच्या थकबाकीतील 50 टक्के रक्कम माफ करण्यात आली आहे. त्यानंतर सप्टेंबर 2020 पासून आजवरच्या चालू बिलाची रक्कम जोडून या धोरणांतर्गत देय थकबाकीचा आकडा महावितरणने जारी केला आहे. मात्र, टॉप 100 थकबाकीदार हे प्रत्येकी 10 लाख रुपयांपासून 33 लाख रुपयांपर्यंत महावितरणचे थकीत वीज बिल देणे आहेत. या थकबाकीदारांमुळे महावितरणवर कर्जाचा डोंगर मोठया प्रमाणात वाढत चालला आहे. ऊर्जा विभागाच्या अभ्यासात उघड झालेल्या आकडेवारीनुसार थकबाकी असलेले सर्वाधिक कृषीपंप साखर पट्ट्यातील आहेत.

योजनेनंतर थकबाकी
सर्वाधिक थकबाकीची रक्कम कृषी पंप धोरणांतर्गत 50 टक्के माफ केल्यानंतरची आहे. 50 टक्के सवलत मिळूनही हे कृषी पंप धारक आपली थकबाकी जमा करत नसल्याचे दुर्दैवी चित्र या निमित्ताने उघड झाले आहे. त्यामुळे या थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्याचा विचार महावितरणच्या स्तरावर सुरू आहे.

टॉप 10 मध्येही नगरचा एक
राज्यातील सर्वाधिक 10 कृषीपंप थकबाकीदारांकडे एकूण 1 कोटी 57 लाख 22 हजार 200 रुपये इतकी रक्कम थकित आहे. यात पुण्याचे तीन, सोलापूरचे 4 आणि कोल्हापूर, औरंगाबाद व अहमदनगर येथील प्रत्येकी 1 थकबाकीदार आहे. नगर जिल्ह्यातील रखमाजी डेअरी अ‍ॅग्रो प्रॉडक्ट (मंची हिल,संगमनेर, अहमदनगर) यांच्यासह 12 लाख 56 हजार 860 रुपये थकीत आहेत.

COMMENTS