Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर गणेशोत्सव काळात 55 तडीपारांना भूमिगत होण्याची वेळ

फलटण / प्रतिनिधी : उपविभागीय अधिकारी फलटण यांनी दि. 30 ऑगस्ट रोजी 55 जणांना फलटण नगरपालिका हद्दीमधून गणेश उत्सवकाळात हद्दपारीचा आदेश दिल्यानंतर वृत्त

जीप पलटी झाल्याने जेजुरीहून धुळदेवकडे निघालेल्या नवरदेवाचा अपघाती मृत्यू
सुपने विकास सेवा सोसायटीत उंडाळकर गटाचा एकहाती विजय
कोयनानगर येथे राज्य आपत्ती बचाव दल स्थापन करण्याबाबतची आढावा बैठक

फलटण / प्रतिनिधी : उपविभागीय अधिकारी फलटण यांनी दि. 30 ऑगस्ट रोजी 55 जणांना फलटण नगरपालिका हद्दीमधून गणेश उत्सवकाळात हद्दपारीचा आदेश दिल्यानंतर वृत्तपत्राच्या बातमीची दाखल घेऊन शहर पोलिसांना 55 जणांची यादी जाहिर करावी लागली. खुलेआम फिरणार्‍या तडीपारांना अखेर भूमिगत व्हावे लागले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 30 ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी फलटण यांनी 55 जणांना फलटण नगरपालिका हद्दीमधून दि. 31/8/2022 ते 9/9/2022 या गणेश उत्सव काळात हद्दपारीचा आदेश दिला होता. दरम्यान, तडीपारीच्या आदेशाचा भंग करून काहीजण शहरात राहत असल्याचे दिसून आले होते. दि. 5 अखेर पोलीस प्रशासनाकडून तडीपारीची माहिती जाहीर करण्यात आली नव्हती. यामुळे काहीजण बेधडक नियम पायदळी तुडवत शहरात वावरत होते. याबाबत प्रसार माध्यमांनी पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर निशाना साधताच शहर पोलिसांनी अखेर दि. 5 रोजी तडीपारीची कारवाई केलेल्या 55 जणांची यादी जाहिर केली. दरम्यान, तडीपारांची यादी झळकताच अनेक तडीपारांनी शहरातून काढता पाय घ्यावा लागला होता.
शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनूसार फलटण शहर पोलिस ठाणे हद्दितील गणेशोत्सव कालावधीत तडीपार केलेल्या लोकांची यादी खालीलप्रमाणे : सनी संजय अहिवळे (रा. मंगळवार पेठ, फलटण, ता. फलटण), अभिजीत बाळासो जानकर (रा. शनिनगर, शुक्रवार पेठ, फलटण, ता. फलटण), शिवाजी ऊर्फ शाहुजी बंडु मदने, अमर ऊर्फ चंगु भगवान शिरतोडे (वय 30), राहुल अंबादास गवळी (वय 28), रोहन सुभाष मदने (वय 33), कुणाल लालासो भंडलकर (वय 25), राजू बाळासाहेब शिरतोडे (वय 43), तेजस शाहुजी मदने (सर्व रा. उमाजी नाईक चौक, फलटण, ता फलटण), विजय सदाशिव गिरी (रा. मलटण, फलटण, ता फलटण), अभिजीत पांडुरंग पवार (वय 39, पवारगल्ली, फलटण, ता. फलटण) तौफिक ऊर्फ छोटू अब्दुल शेख (रा. गजानन चौक, फलटण, ता. फलटण) रणजित सुभाष ठोंबरे, आदित्य अविनाश चोरमले (दोघे रा. बुधवार पेठ, फलटण, ता फलटण) अथर्व महेश सरगर, रोहण महेश सरगर, ओंकार किरण सरगर, मनिष महेश सरगर (सर्व रा. खाटीकगल्ली, कसबा पेठ, फलटण, ता. फलटण) अफताब फारुख मनेर, सौरभ गणेश नाईक (दोघे रा. शुक्रवार पेठ, फलटण, ता. फलटण), मिथुन सायबू जाधव, लहू रामस्वामी जाधव (वय 29), गणेश शंकर जाधव, रोहीत संतोष अडागळे, राम वसंत पवार, लखन वसंत पवार, राहूल नरेश पवार, प्रमोद अनिल जाधव, अविनाश अनिल जाधव, सतीश लक्ष्मण जाधव, तुषार अनिल जाधव, उमेश नरसिंग पवार (वय 35), अविनाश शंकर पवार (वय 29), रोहित ज्ञानू पवार (वय 35), राहुल राजू पवार (वय 27), अविनाश सोमा जाधव (वय 30), अनिल रमेश पवार (वय 39), कृष्णा देविदास पवार (वय 26), शंकर ज्ञानू पवार (वय 24), अभिषेक देविदास पवार (वय 24,) विक्रम शंकर पवार (वय 28), साहील अविनाश पवार (वय 19), देविदास किसन पवार (वय 48), देविदास ज्ञानू पवार (वय 39), अरूण नरसिंग पवार, मंगेश प्रमोद आवळे, रोहन रमेश पवार, वरून नरेंद्र कुचेकुरवे, रमेश तुकाराम पवार, रूपेश विलास पवार (वय 20), साहिल विलास पवार (वय 19), दिलीप तुकाराम पवार (वय 47), राहूल गणेश / रमेश पवार, विलास तुकाराम पवार (वय 44, सर्व रा. सोमवार पेठ, फलटण, ता. फलटण) या वरील 55 जणांना उपविभागीय अधिकारी फलटण यांच्या आदेशानुसार फलटण नगरपालिका हद्दीमधून दि. 31/8/2022 ते 9/9/2022 या कालावधीत हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवार यांनी दिली आहे.
दरम्यान, दि. 5 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास जिंती नाका फलटण येथे विजय सदाशिव गिरी (वय 45, रा. मलटण, फलटण, ता. फलटण) हा उपविभागीय अधिकारी फलटण यांच्या आदेशानुसार फलटण नगरपालिका हद्दीमधून दि. 31/8/2022 ते 9/9/2022 या कालावधीत हद्दपार केलेले असताना विनापरवाना आदेशाचा भंग करून फलटण पोलिसांना आढळून आला. या प्रकरणी त्यास अटक करण्यात आली आहे. हवालदार निलेश विष्णू काळोखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पो. ना. यादव करत आहेत.

COMMENTS