निकाल येईपर्यंत धार्मिक पेहरावाचा आग्रह नको; कर्नाटक उच्च न्यायालयाचे विद्यार्थ्यांना निर्देश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निकाल येईपर्यंत धार्मिक पेहरावाचा आग्रह नको; कर्नाटक उच्च न्यायालयाचे विद्यार्थ्यांना निर्देश

बंगळुरू/वृत्तसंस्था ः कर्नाटकात हिजाब प्रकरण चांगलेच चिघळले असून याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात गुरूवारी सुनावणी झाली. यावेळी हिजाब प्रकरणी जोपर्य

हवामान बदलांमुळे हापूसच्या आवकमध्ये घट
निर्बंध लादणारा फतवा
भाजपशी युती हाच शेवटचा पर्याय : पुरुषोत्तम खेडेकर

बंगळुरू/वृत्तसंस्था ः कर्नाटकात हिजाब प्रकरण चांगलेच चिघळले असून याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात गुरूवारी सुनावणी झाली. यावेळी हिजाब प्रकरणी जोपर्यंत कर्नाटक उच्च न्यायलय अंतिम निकाल देत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांनी शाळा, कॉलेजमध्ये धार्मिक पेहरावाचा आग्रह धरू नये, असे महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.
देशभरात हिजाब प्रकरण चांगलच तापले असून, विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजमध्ये हिजाब घालण्यास परवानगी द्यावी की, नाही, यावर चर्चा असून, हे प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात पोहचले आहे. कर्नाटक सरकारने हिजाबला परवानगी देण्यास नकार दिल्यानंतर याप्रकरणी उच्च न्यायालय काय निर्णय देते, यावर पुढील दिशा ठरणार आहे. कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये गेल्या सलग दोन दिवसांपासून हिजाब प्रकरणांवर सुनावणी सुरू असून, गुरूवारी देखील याप्रकरणी सुनावणी पार पडली. मुस्लीम मुलींना शाळा किंवा कॉलेजमध्ये हिजाब घालण्यास परवानगी द्यावी की नाही? याविषयी सध्या मोठी चर्चा सुरू असून हे प्रकरण थेट न्यायालयापर्यंत पोहोचलं आहे. कर्नाटक उच्च न्यायालयात यासंदर्भात सध्या सुनावणी सुरू असून यासंदर्भात न्यायालयानं आज महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी होईपर्यंत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक संस्था किंवा विद्यार्जनाच्या ठिकाणी धार्मिक पेहेराव करण्याचा आग्रह धरू नये असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्देशांवर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. कर्नाटकच्या उडुपीमध्ये बुरखा परिधान करण्यावरून सुरू असलेला वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. बुरखा किंवा हिजाब घालून महाविद्यालयात येणार्‍या काही विद्यार्थिनींना कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. तिथून या प्रकरणाला सुरूवात झाली आहे. यानंतर या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणावर टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणार्‍या मुस्लीम विद्यार्थिनींना कर्नाटकमध्ये सातत्याने महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे. कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकार्‍यांनी देऊनही काही मुस्लीम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभे करण्यात आले. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शने केली. त्याचवेळी या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवे उपरणे घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते. त्यामुळे हा विषय अधिकच चिघळला.

हिजाबचा खटला सर्वोच्च न्यायालयाकडे वर्ग करावा ः सिब्बल
कर्नाटक राज्यात शाळा-महाविद्यालये बंद पडली आहेत. या पार्श्‍वभूमीवर कर्नाटकात सुरु असलेला हिजाब प्रकरणाचा खटला आपल्याकडे वर्ग करावा, असा युक्तिवाद काँगे्रस नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केला.यावर याचिका दाखल करून घेण्याबाबत विचार करता येईल, अशी टिप्पणी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी केली. कर्नाटकात मुलींवर दगडफेक करण्यात आली. तूर्तास हे प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. उच्च न्यायालय यावर फैसला करु दे, असेही रमणा यांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS